आमदार अशोक पवार यांना भर चौकात जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्रामुळे खळबळ
जिल्ह्यात शिरूर-हवेली मतदारसंघातील आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनामी पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरूर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टाद्वारे हे पत्र आले आहे.
पुणे : जिल्ह्यातील शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरूर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टाद्वारे हे पत्र आले आहे. या पत्रात उद्योजक प्रकाश धारिवालांसह नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहे.
पत्रात भर चौकात जीवे मारण्याची धमकी
या पत्रात आमदार अशोक पवार यांचा महेंद्र मल्लाव करण्याची धमकी देण्यात आली आहे. काही वर्षापूर्वीच शिरूरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भर चौकात दिवसा हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आमदार अशोक पवार यांनाही भर चौकात जीवे मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. या धमकीपत्रानंतर शिरुर-हवेली मतदारसंघात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
धमकी नेमकी कोणी दिली, पोलिसांनी दखल घेण्याची मागणी
लोकप्रतिनिधींना अशा धमक्या येत असतील तर त्यांनी कामे कशी करायची असा सवाल विचारला जात आहे. तसेच पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे. दरम्यान, ही धमकी नेमकी कोणी दिली ? का दिली हे अजूनतरी समजू शकलले नाही.
नमिता मुदंडा यांच्या पतींना जीवे मारण्याची धमकी
लोकप्रतिनिधींना शिवीगाळ करणे किंवा धमकावण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाहीये. यापूर्वी माजी आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा यांचा मुलगा आणि केज विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार नमिता मुदंडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना एकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. तीन ऑक्टोबर रोजी ही धमकी देण्यात आली होती. या धमकीची ऑडिओ क्लिप नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. रस्त्याच्या कामावरुन ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अक्षय मुंदडा यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
इतर बातम्या :
चंद्रकांतदादांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख, निलेश लंके भडकले, म्हणाले, सत्तेचा माज आलाय काय?
डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंप? भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, यशवंत जाधवांचा दावा
ईद-ए-मिलाद-उन्नबी निमित्त उद्या 19 ऑक्टोबरला औरंगाबादेत विविध कार्यक्रमांचे आयोजन, विद्युत रोषणाईने उजळले शहरhttps://t.co/zz6xHuHdSP#EidMiladunNabi| #Aurangabadfestival|
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2021
(MLA Ashok Pawar from pune Shirur-Haveli constituency got life threatening letter)