“रुग्णांना बाहेर पाठवू नका, दाखल करुन उपचार करा”, अहमदनगरमध्ये आमदाराने डॉक्टरांसमोर हात जोडले
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी हात जोडून आलेल्या रुग्णांना बाहेर पाठवू नका, दाखल करुन घ्या आणि उपचार करा, अशी डॉक्टरांना विनंती केली.
अहमदनगर : अहमदनगरमधील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. बेड्सपासून कोरोना चाचणी आणि कोरोना लसींपर्यंत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यात सुरु करण्यात आलेल्या सर्व खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी संबंधितांना हात जोडून आलेल्या रुग्णांना बाहेर पाठवू नका, दाखल करुन घ्या आणि उपचार करा, अशी विनंती केली. त्यांच्या या कृतीची सध्या नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे (MLA Ashutosh Kale request Covid health center chiefs to admit corona patient in Kopargaon).
कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांच्या बैठकीत आमदार आशुतोष काळे म्हणाले, “कोपरगाव तालुक्यातील सर्व रुग्णांना दाखल करून घ्या. त्यांच्यावर उपचार करा. रुग्णांना बाहेर पाठवू नका अशी हात जोडून कळकळीची विनंती.” यावेळी त्यांनी खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन यावेळी दिले.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. दत्तात्रय मुळे, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. योगेश कोठारी, डॉ. राजेश माळी, डॉ. मयूर तिरमखे, डॉ. संकेत माळी, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे प्रसाद कातकडे, आत्मा मलिक हॉस्पिटलचे शरद अनारसे, अभिमन्यू सूर्यवंशी, कांचन कदम आदी उपस्थित होते.
अहमदनगरमधील कोरोनाची स्थिती काय?
अहमदनगर जिल्ह्यात आज (11 एप्रिल) 1617 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 1 हजार 907 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.82 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 2414 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 12,858 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेतील तालुकानिहाय कोरोना रुग्ण
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 902, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 412 आणि अँटीजेन चाचणीत 1100 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 358, अकोले 67, जामखेड 08, कर्जत 37, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 74, नेवासा 21, पारनेर 43, पाथर्डी 21, राहता 71, राहुरी 04, संगमनेर 37, शेवगाव 25, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 55, कॅंटोन्मेंट बोर्ड 39, मिलिटरी हॉस्पिटल 06 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेतील तालुकानिहाय कोरोना रुग्ण
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 92, अकोले 17, जामखेड 02, कर्जत 03, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 21, नेवासा 09, पारनेर 13, पाथर्डी 03, राहाता 132, राहुरी 17, संगमनेर 23, शेवगाव 01, श्रीगोंदा 06, श्रीरामपूर 31, कॅंटोन्मेंट बोर्ड 08 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
तालुकानिहाय अँडीजेन चाचणी आकडेवारी
अँटीजेन चाचणीत आज 1140 जण बाधित आढळून आले. मनपा 81, अकोले 87, जामखेड 39, कर्जत 95, कोपरगाव 46, नगर ग्रामीण 103, नेवासा 35, पारनेर 81, पाथर्डी 35, राहाता 78, राहुरी 133, संगमनेर 10, शेवगाव 45, श्रीगोंदा 34, श्रीरामपूर 157, कॅन्टोन्मेंट बोर्ड 40 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 491, अकोले 39, जामखेड 08, कर्जत 97, कोपरगाव 77, नगर ग्रामीण 98, नेवासा 51, पारनेर 31, पाथर्डी 52, राहाता 190, राहुरी 126, संगमनेर 98, शेवगाव 27, श्रीगोंदा 45, श्रीरामपूर 105, कॅन्टोन्मेंट 61, इतर जिल्हा 20 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगरमध्ये एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 907, उपचार सुरू असलेले रूग्ण 12 हजार 858, मृतांची संख्या 1282 आणि एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 16 हजार 47 इतकी आहे.
हेही वाचा :
अहमदनगरमधील पत्रकाराच्या हत्या प्रकरणात भाजपचे आरोप, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात…
अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून हत्या, राहुरीत मृतदेह आढळला
व्हिडीओ पाहा :
MLA Ashutosh Kale request Covid health center chiefs to admit corona patient in Kopargaon