“रामदास कदम गडी केवडा आणि ओरडतो केवढा”; ठाकरे गटाच्या नेत्यानं रामदास कदम यांची उडवली खिल्ली

शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे गटातील गद्दार आमदारांनीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असल्याची टीका त्यांच्यावर करणअयात आली.

रामदास कदम गडी केवडा आणि ओरडतो केवढा; ठाकरे गटाच्या नेत्यानं रामदास कदम यांची उडवली खिल्ली
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 10:08 PM

रत्नागिरीः मला आणि माझ्या मुलाला संपवलं असं विधान रामदास कदम वारंवार करत असतात मात्र तुम्हाला कोण संपवतो असा थेट सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.दापोली केळशीतील सभेवेळी भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत बोलताना रामदास कदम गडी केवढा आणि ओरडतो केवढा असा टोला लगावत त्यांची खिल्ली उवडवण्यात आली.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज रामदास कदम यांच्यासह त्यांचा मुलावरही जोरदार हल्लाबोल केला. रामदास कदम यांची जीभ काळी आहे तर योगेश कदम यांच्या हातात काळा दोरा असल्याची टीका करत पिता पुत्रांची खिल्ली उडवली आहे.

भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका करताना कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचा गौरवही केला.

तर यावेळी भाजपवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे कोरोना काळात राज्य संकटात असताना भाजप मात्र त्यावेळचे ठाकरे सरकार पडणार असल्याची वक्तव्य तासा तासाला केली जात होती.

संकटकाळात विरोधक सत्ताधाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतात तर आपल्या राज्यात मात्र संकटकाळात सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत होते अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटावर ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच आजही आमदार भास्करराव जाधव यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला.

शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे गटातील गद्दार आमदारांनीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असल्याची टीका त्यांच्यावर करणअयात आली.

1966 पासून शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह देव्हाऱ्यात पुजले जात होते, मात्र 40 गद्दार शिवसेना सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आले होते अशी भाविनक गोष्टही त्यांनी सांगितली.

उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले खरे शिवसैनिक नाहीत तर गेलेले सर्व गद्दार आहेत. हे सांगण्यासाठीच मतदार संघात आलो आहे असंही भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.