आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

mla kiran sarnaik: शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला आहे.

आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 9:04 AM

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना अकोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.

दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.

मृतांमध्ये या लोकांचा समावेश

वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडली. आमदार किरण सरनाईक यांच्या नातेवाइकाचे कुटुंब हे कारने वाशिमकडून अकोल्याकडे येत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची पातूर उड्डाणपुलाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये रघुवीर अरुणराव सरनाईक (रा.वाशीम) शिवानी अजिंक्य आमले (रा.नागपूर) अस्मिता अजिंक्य आमले (रा.नागपूर) अमोल शंकर ठाकरे, कपिल प्रकाश इंगळे, सिद्धार्थ यशवंत इंगळे हे सहा जण ठार झाले. या अपघातामध्ये ३ जण जखमी झाले आहे. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे.

हे सुद्धा वाचा

गावकऱ्यांची मदतीसाठी धाव

अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी गावकऱ्यांनी धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर मदतकार्य सुरु झाले. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.