आमदार गळाले, नगरसेवक पळाले, उद्धव ठाकरे गटाचे होणार तरी काय? आणखी एक माजी नगरसेवक…

मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत.

आमदार गळाले, नगरसेवक पळाले, उद्धव ठाकरे गटाचे होणार तरी काय? आणखी एक माजी नगरसेवक...
MANGESH SATAMKARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 4:13 PM

मुंबई । 28 जुलै 2023 : उद्धव ठाकरे यांची सोबत सोडून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत घरोबा केला. त्यानंतर विधानपरिषदेतील आमदारांचीही गळती सुरु झाली. विप्लव बाजोरिया, मनीषा कायंदे आणि त्यापाठोपाठ उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर, उद्धव ठाकरे यांच्या महापालिकेतील नगरसेविका शीतल म्हात्रे, यशवंत जाधव यांच्यासारख्या महत्वाच्या मोहऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशीच सभागृह नेत्या तृष्ण विश्वासराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आणखी एका शिलेदाराने शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली ही अनोखी गिफ्टच म्हणावी लागेल.

एकनाथ शिंदे यांच्यापासून सुरु झालेली गळती रोखण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे असेल त्यांनी निघून जावे असा शब्दात बंडखोरांची संभावना केली होती. त्यामुळे पक्षात असलेल्या नाराजांची संख्या अधिक वाढली आणि पक्षाला गळती सुरु झाली. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्यापाठोपाठ आता मंगेश सातमकर यांनीही जय महाराष्ट्र केला आहे. नजीकच्या काळात ठाकरे गटाला बसलेला हा चौथा धक्का मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा

मंगेश सातमकर हे 1994 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर 2002, 2007, 2017 मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2004, 2006, 2007, 2018 मध्ये सातमकर यांनी महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. 2014 मध्ये त्यांनी सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.

अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल होता.

मंगेश सातमकर यांच्याविरोधात वडाळा टीटी पोलीस ठाण्यात एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. ही पीडित महिला त्यांच्या सायन येथील कार्यालयात काम करत होती. सातमकर यांनी लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा अत्याचार केला असे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.