MLC Election 2024 : दोन दिवस भेटीगाठी, चर्चा, मार्गदर्शन, तरीही शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांचा आमदारांना फोन?, काय झाली चर्चा? निवडणुकीत खेलो होबे?

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांसाठी आज मतदान होत असून सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रात्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा केली.

MLC Election 2024 : दोन दिवस भेटीगाठी, चर्चा, मार्गदर्शन, तरीही शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांचा आमदारांना फोन?, काय झाली चर्चा? निवडणुकीत खेलो होबे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 9:47 AM

राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडत आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग आला असून सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार असले तरी एकूण 12 उमेदवार मैदानात असल्याने कुणाची विकेट पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत महायुतीकडून 9 वा उमेदवार देण्यात आल्याने आता ही निवडणूक रंगतदार झाली आहे.

महाविकास आघाडीने एक्स्ट्रा उमदेवार दिल्याने या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आमदार फुटू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ताज लँड हॉटेलमध्येच मुक्काम केला. मुख्यमंत्र्यांसाठी या हॉटेलमध्ये एक रूम बुक करण्यात आली होती. निवडणूकीचा दिवस अवघ्या काही तासांवर आलेला असतानाच काल रात्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा केली. विजय आपला निश्चित आहे असं आश्वासनही त्यांनी दिलं अशी माहिती समोर आली आहे.

त्यानंतर आज सकाळीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांसोबत फोनवर चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. मतदानासंदर्भात शिंदेंनी आमदारांना पुन्हा नीट सूचना दिल्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातील पक्ष कार्यालयात सगळ्या आमदारांना सूचना दिल्या. पक्ष कार्यालयातून जाताना आमदारांना मार्गदर्शन केले.

हे सुद्धा वाचा

पार पडलं पहिलं मतदान

आज ९ ते ५ या वेळेत मतदान होत असून शिंदे गटाचे आमदार आता विधानभवनात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. काही आमदार हे बसने विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. नवाब मलिक हे देखील मतदानासाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे विधान परिषद निवडणुकीतील पहिलं मतदान पार पडलं आहे. शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी मतदान केलं आहे. हळूहळू इतर सर्व आमदारही विधान भवनात पोहोचत आहेत. ताज्या माहितीनुसार, साडेनऊ वाजेपर्यंत १५ हून अधिक आमदारांनी मतदान केलं आहे.

महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील – दिलीप वळसे पाटील यांना विश्वास

दरम्यान महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. त्या अनुषंगाने आम्ही आखणी केली आहे. ह्यावेळी घोडे बाजार होईल असे वाटत नाही. सर्व पक्षांची मत निश्चित आहे. जे मत सरप्लस असतील तर ते मत येऊ शकते. कोणाला मतं द्यायची, काय मतं द्यायची हे निश्चित आहे. फोडाफोडीचे राजकारण करायची गरज नाही, कोण हरेल हे सांगणं अवघड आहे असे त्यांनी नमूद केलं.

विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?

विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 उमेदवार पाहायला मिळत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे. तर शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

भाजपने पाच उमेदवार दिले आहेत. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाने या दोन उमेदवारांना तिकीट दिलं आहे. अजितदादा गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसने प्रज्ञा सातव आणि शेकापने जयंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. जयंत पाटील हे शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली जात आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.