Shivsena Ubt | “तर त्यादिवशीच लाथ मारायची….”, खुद्दारीच्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाकडून जशास तसं उत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या घणाघाती टीकेला उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार आणि सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. जाणून घ्या.

Shivsena Ubt | तर त्यादिवशीच लाथ मारायची...., खुद्दारीच्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाकडून जशास तसं उत्तर
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 1:37 AM

मुंबई | कोकणातील खेडमधील गोळीबार मैदानात शिवसेनेच्या वतीने निष्ठावंतांच्या एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदेंच्या शिवसेनेतील रामदास कदम यांनी ही सभा प्रतिष्ठेची केली होती. उद्धव ठाकरे यांनी 5 मार्च रोजी याच मैदानात सभा घेऊन शिंदेंच्या शिवेसेनेवर आरोप प्रत्यारोप केले होते. याच टीकेला उत्तर देण्यासाठी गोळीबार मैदानात उत्तर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतून रामदास कदम, त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.  काही दिवसांपूर्वी इथे झालेली सभा ही फुसका बॉम्ब आपटी बॉम्ब होता. आम्ही गद्दार नाही, तर खुद्दार आहोत असं म्हणत ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. आता या उत्तराला ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे.

शिंदे काय म्हणाले होते?

“उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला लावलेला डाग आम्ही पुसला. सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. मी गद्दार नाही तर खुद्दार, सत्तेसाठी मिंधा झालो नाही”, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी खेडमधील सभेतून केला. या टीकेला आता ठाकरे गटाकडून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

“उद्धव ठाकरेंची सभा ही फुसका बॉम्ब होता मग उत्तर देण्यासाठी सभा का घेतली? स्वत: अडीच-तीन वर्ष राहून सत्तेचा लाभ घेतला. त्यानंतर आता ती सत्ता चुकीची होती असं म्हणता, हा दुटप्पीपणा आहे. या बोलण्यात सत्यता असती तर ज्या दिवशी शपथविधी झाला, त्याच दिवशी लाथ मारायला पाहिजे होती ना. शपथ घेतली, मंत्रिपद घेतलं, मंत्रिपदाचा उपयोग केला. इतकं उपभोगून तुम्ही आता कसं म्हणता की तेव्हा चुकीची सत्ता केली”, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

“सत्तेसाठी स्वत:चा पक्ष फोडणार आहेत ते. गद्दार नाही तर काय, खुद्दा कसं काय म्हणता येईल? जर तुम्ही खुद्दार आहात ना, तर उद्धव ठाकरे यांनी निवडणू आणलेले 40 तुमच्या सोबत आहेत, त्यांनी राजीनामा द्या आणि स्वत:च्या जोरावर निवडणूक लढा, त्याला खुद्दारी म्हणता येईल”, अशा शब्दात दानवे यांनी गद्दार खुद्दार या वक्तव्यावरुन सुनावलं.

“उद्धव ठाकरे यांच्याकडून तिकीट घ्यायचं, लढायचं आणि निवडून यायचं, गद्दारी करायची त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसायचा ही कोणती खुद्दारी आहे, ही गद्दारी आहे. तुमच्यात जर खरंच खुद्दारी असेल तर 40 जणांनी राजीनामा द्यावा आणि निवडून यावं, त्यावेळेस खुद्दारी म्हणता येईल. आता तर तुम्ही गद्दारच आहात”, असंही दानवे म्हणाले. दरम्यान आता दानवे यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून कोण आणि काय उत्तर देतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.