Video | टोल वसुलीवरुन मनसे पुन्हा आक्रमक, भिवंडीमध्ये लाठ्या-काठ्यांसह टोलनाक्याची तोडफोड
भिवंडी येथील खारबाव मालोडी परिसरातील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी अखेर फोडला आहे. काल मनसेचे अविनाश जाधव यांनी टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर टोल वसुली बंद करण्यात आली होती.
ठाणे : भिवंडी येथील खारबाव मालोडी परिसरातील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी अखेर फोडला आहे. काल मनसेचे अविनाश जाधव यांनी टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर टोल वसुली बंद करण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी पुन्हा टोलनाका सुरु केल्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले. यातच त्यांनी मोलाडी परिसरातील टोलनाक्याची तोडफोड केली. (MNS activists carrying MNS flag raised slogans and broke toll naka in Bhiwandi)
रस्ता दुरुस्त करण्यासाठी अनेकवेळा निवेदनं
भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा-खारबाव-कामण-चिंचोटी फाटा या दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या विरोधात स्थानिकांसह विविध राजकीय पक्षांकडून आंदोलनांसोबतच निवेदने देण्यात आली होती. मात्र, निवेदने देऊनही या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. याच कारणामुळे शुक्रवारी मनसे सैनिकांनी टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली आहे.
इशारा देऊनही पुन्हा टोलवसुली सुरू ठेवल्यामुळे आक्रमक
अंजुरफाटा-खारबाव-कामण-चिंचोटी फाटा या दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करावी. रस्त्याची दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी या टोलनाक्यावर अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली होती. परंतु मनसेने इशारा देऊनही पुन्हा टोलवसुली सुरू करण्यात आली. याची कुणकुण मनसे सैनिकांना लागताच शुक्रवारी दुपारी बारा वाजता मनसैनिकांनी मालोडी परिसरातील टोलनाक्याची तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी हातातील लाकडी काठ्यांनी टोल वसूल करणाऱ्या कॅबिनीची तोडफोड केली. तसेच तोडफोड करुन घटनास्थळावरुन पोबारा केला.
तोडफोड करणाऱ्यांच्या हातात मनसेचा झेंडा
तोडफोडीचा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. यामध्ये मनसे सैनिक हातात काठ्या घेऊन टोलनाक्याची तोडफोड करताना दिसत आहेत. या तोडफोडीदरम्यान कार्यकर्त्यांच्या हातात मनसेचा झेंडादेखील आहे. मनसैनिकांच्या या तोडफोडीमुळे टोलनाक्याचे मोठे नुकसान झालंय. या घटनेने खळबळ उडाली असून तालुका पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती घेऊन त्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
खासदार संभाजी छत्रपती आक्रमक; सरकारला पहिल्यांदाच दिलं खुलं आव्हान
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे SP ना निर्देश, पडळकरांना दणका!
Skin Care : सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी नारळाचे दूध अत्यंत फायदेशीर, वाचा! https://t.co/tzhB749kcj | #SkinCare | #Coconutmilk | #Beautytips | #Beneficial | #Glowingskin | #Skincaretips | #Skin | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2021
(MNS activists carrying MNS flag raised slogans and broke toll naka in Bhiwandi)