राज ठाकरे यांनी निवडणुकीआधीच पत्ते केले उघड, फडणवीसांकडून करेक्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मोठी भविष्यवाणी केली होता. राज्यात निवडणुकीनंतर भाजपची मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असा दावा केला होता. त्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांनी निवडणुकीआधीच आपले पत्ते उघड केल्याने त्याचा त्यांना फायदा होईल का हे २३ तारखेलाच कळणार आहे.
महायुतीचं सरकार येणार आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार, असं राज ठाकरे यांनी म्हटल्यावर, फडणवीसांनीही तात्काळ आभार व्यक्त केले. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यात करेक्शनही केलं. भाजपचा मुख्यमंत्री नाही तर महायुतीचा मुख्यमंत्री होणार असं फडणवीस म्हणाले आहेत.
Follow us
महायुतीचं सरकार येणार आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार, असं राज ठाकरे यांनी म्हटल्यावर, फडणवीसांनीही तात्काळ आभार व्यक्त केले. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यात करेक्शनही केलं. भाजपचा मुख्यमंत्री नाही तर महायुतीचा मुख्यमंत्री होणार असं फडणवीस म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाहीत. शिवसेनेत असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपशीच आला. सरकार महायुतीचं बनणार, 3 महिन्यापूर्वी मविआचं सरकार येणार असं वाटत होतं. पण हरियाणाच्या निकालानंतर थोडं चित्र बदललं आहे, मात्र महायुतीला इतकं सोपंही नाही. मुख्यमंत्री भाजपचा होईल, आणि मनसे सत्तेत असेल. भाजपचा मुख्यमंत्री मनसेच्या साथीनं होईल असं राज ठाकरे म्हणालेत.
राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे उघडपणे सांगतायत की निकालानंतर भाजपसोबत जाणार. मनसेचे 100 आमदार येणार असा मोठा दावाही त्यांचा आहे. दुसरीकडे भाजपचाच मुख्यमंत्री होईल हेही राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यावर शिंदेंचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी, मुख्यमंत्रिपदावरुन तात्काळ संख्याबळावर बोट ठेवलंय.
महायुती आणि महाविकास आघाडीसह यावेळी वंचित सोबतच महाशक्ती परिवर्तन ही तिसरी आघाडी सुद्धा मैदानात आहे. जरांगेंचेही उमेदवार मैदानात असतील आणि या लढाईत भाजपचे 50 आमदारही निवडून येणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
महायुतीच्या विरोधातच राज ठाकरेंनी 135 उमेदवार उभे केले. मात्र मतदान होण्याआधीच राज ठाकरेंनी भाजपसोबत जाणार असल्याचं सांगून पत्तेही उघड केले. त्यामुळे आता राज्यात नवीन समीकरण जुळणार असल्याचं दिसून येत आहे.