MNS Raj Thackeray | एका प्रश्नावर राज ठाकरे सरळ बोलले ‘घंटा’ अपेक्षा
MNS Raj Thackeray | राज ठाकरे यांना विचारलेला तो प्रश्न काय होता?. एक गट सत्तेत, तर दुसरा विरोधी पक्षात अशी स्थिती आहे. महाराष्ट्राच हे राजकारण अनेकांना पटलेलं नाही.
मुंबई : महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती अनेकांना चक्रावून सोडणारी आहे. मागच्यावर्षी शिवसेना आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एक गट सत्तेत, तर दुसरा विरोधी पक्षात अशी स्थिती आहे. महाराष्ट्राच हे राजकारण अनेकांना पटलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच या राजकीय स्थिती विरोधात आंदोलन सुरु आहे. त्यांनी एक सही संतापाची हे अभियान सुरु केलय. आज राज ठाकरे शिवाजी पार्क येथे एक सही संतापाची अभियानात सहभागी झाले होते.
त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोख-ठोक भाष्य केलं. त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले.
‘प्रत्येक घरात संताप’
एक सही संतापाची या प्रश्नावर त्यांनी “हे तुम्हाला दिसतय ते प्रातिनिधीक आहे. तुम्ही घराघराचा कौल घेतला, तर प्रत्येक घरात संताप आहे. ज्या प्रकारच राजकारण महाराष्ट्रात झालं, ते संतापजनक, घाणेरड आहे. याआधी असं कधी घडलं नव्हतं, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवणारी ही घटना आहे” अशी टीका राज ठाकरे यांनी केली. असं उत्तर राज ठाकरेच देऊ शकतात
“सध्या ज्या तडजोडी सुरु आहेत, त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. भांडतात एकत्र येतात. जे डॅमेज व्हायचय ते झालय. भविष्यातल्या पिढ्यांसाठी ज्यांना राजारणात यायचय त्यांच्या ताटात आपण काय वाढतोय. हे कोणत्या प्रकारच राजकारण आहे. हेच राजकारण असेल, तर महाराष्ट्राच राजकारण कुठे चाललय याचा आपण साधा विचार करतोय का? सत्ता आणि स्वार्थाच हे राजकारण घाणेरडं आहे” असं राज ठाकरे म्हणाले. पावसाळी अधिवेशनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी ‘घंटा’ असं उत्तर दिलं.