अनिल परब यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये आता मनसेने उडी घेतली असून, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

अनिल परब यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 2:59 PM

पंढरपूर – एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होताना दिसत आहेत. तुटपुंज्या वेतनामध्ये घर चालवने कठीण झाले आहे. मात्र आता ते वेतनही वेळेवर मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या केल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. एकूणच  कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. आता या आंदोलनामध्ये मनसेने देखील उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय बिटक असून, अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला जबाबदार परिवहन मंत्री अनिल परब हेच असल्याचा आरोप मनसे नेत दिलीप धोत्रे यांनी केला आहे. या प्रकरणी परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत संपूर्ण वाहतुक व्यवस्था ठप्प असल्याने, त्याचा सर्वाधिक फटाक हा एसटीला बसला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देखील रखडले होते. कोरोना काळात सर्व कामे ठप्प असताना देखील अनेक कर्मचाऱ्यांच्या अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी कर्तव्यावर बोलवण्यात आले होते. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव देखील गमवावा लागला. मात्र तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याची सरकारने दखल न घेतल्याने एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत.

महागाई भत्ता वाढीचा निर्णय 

दरम्यान आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात बेमुदत उपोषण देखील सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत, एसटी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आल्याने, हे उपोषण मागे घेण्यात आले . मात्र या एक दिवसाच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

संबंधित बातम्या 

‘गुलाबराव झोपा काढतात का?’, उन्मेष पाटलांचा सवाल; नारायण राणेंना पुरुन उरलोय, नादी लागू नका, पालकमंत्र्यांचा पलटवार

मुंबईत वार्ड पुनर्रचनेचा वाद पेटण्याची शक्यता; मतदारांची नावे गायब करण्याचा प्रयत्न सुरु, भाजपचा आरोप

सोमय्यांनी खोटे आरोप करणे बंद करावे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार : अतुल लोंढे

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.