राज साहेबांच्या माणसाला हात लावला तर हातपाय तोडा, जामीन करायची जबाबदारी आमची, कोण म्हणालं
नाशिक शहरात पालिकेचे कंत्राटी सफाई कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.
नाशिक : याच्यापुढे एकाने जरी मारलं तरी त्याला घरात घुसून मारा, त्यांना कळू ही राज साहेबांच्या (Raj Thackeray) एका माणसाला जरी मारलं तरी हातपाय तोडले जातात. संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. याच्यापुढे कुणी हात लावला तरी शंभरच्या शंभर पोरं घरात घुसतील आणि मारतील. तुमचा जामीन करायची जबाबदारी आमची असे विधान मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी केले आहे. नाशिकमधील सफाई कामगारांच्या भेटीला आलेल्या जाधव यांनी यावेळी ही प्रतिक्रिया दिली आहे. युनियन लावण्यावरून कंत्राटदार आणि कामगार यांच्यामध्ये वाद झाला होता. संपूर्ण पगार दिला जात नाही त्यामुळे युनियनच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा कामगारांचा प्रयत्न होता. त्यावेळी कंत्राटदाराने मारल्याचा आरोप कामगारांनी केला होता. यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी कामगारांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी कामगारांची भेट घेत पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत राज ठाकरे जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा तुमची भेट घालून देऊ असेही जाधव यांनी म्हंटले आहे.
नाशिक शहरात पालिकेचे कंत्राटी सफाई कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.
संपूर्ण पगार दिला जात नाही म्हणून युनियन स्थापन करायची, आणि त्या माध्यमातून आंदोलन करायचे अशी भूमिका सफाई कर्मचाऱ्यांनी घेतली होती.
याच दरम्यान कंत्राटदार यांनी मारहान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दखल करावा यासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या बाहेर कामगारांनी मोठी गर्दी केली होती.
याच कामगारांच्या भेटीला आलेले मनसे नेते अविनाश जाधव यांनी कामगारांना पाठिंबा जाहीर करत कुणी हात लावला तर घरात घुसून मारा असे आवाहन केले आहे.
कंत्राटदाराने जर हात लावला तर शंभरच्या शंभर पोरांनी घरात घुसून त्याचे हातपाय तोडा असे म्हणत जामीन करण्याची जबाबदारी आमची असे जाधव म्हणाले आहे.
एकूणच कामगारांच्या बाबत मनसेने पाठिंबा दर्शवत तुमच्या पाठीशी असल्याचे अविनाश शिंदे यांनी म्हंटले आहे.