रेल्वे सुरू करा, मंदिरे उघडा, श्रेयही तुम्हीच घ्या, हवं तर आम्ही ढोल वाजवून स्वागत करू: नांदगावकर

मनसेने पुन्हा एकदा मंदिर उघडण्याची आणि रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहेच. रेल्वे सुरू करा, मंदिरे उघडा. हवं तर त्याचं श्रेय तुम्हीच घ्या. तुमचं अभिनंदन करून हवं तर आम्ही ढोल वाजवू, पण हे कराच, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

रेल्वे सुरू करा, मंदिरे उघडा, श्रेयही तुम्हीच घ्या, हवं तर आम्ही ढोल वाजवून स्वागत करू: नांदगावकर
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 3:24 PM

कल्याण: मनसेने पुन्हा एकदा मंदिर उघडण्याची आणि रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहेच. रेल्वे सुरू करा, मंदिरे उघडा. हवं तर त्याचं श्रेय तुम्हीच घ्या. तुमचं अभिनंदन करून हवं तर आम्ही ढोल वाजवू, पण हे कराच, असा टोला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे. (mns leader bala nandgaonkar on restart railway service)

कल्याण येथे आले असता बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्व ठिकाणी मंदिर उघडली गेली आहे, त्यामुळे राज्यातही रेल्वे सुरू करण्यात यावी. तसेच मंदिरेही लवकरात लवकर उघडली पाहिजे. लोकांसाठी ते आवश्यक आहे. लोकांच्या भावनांचा सन्मान राखणे हे सरकारचं काम आहे. सरकारने ते केले पाहिजे. श्रेय तुम्ही घ्या, आम्ही तुमचं अभिनंदन करू, हवं तर ढोलही वाजवू, असा टोला नांदगावकर यांनी लगावला.

यावेळी त्यांनी जीएसटीच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरले. केंद्र सरकारकडून जीएसटीची किती थकीत रक्कम येणे बाकी आहे. मुख्यमंत्री सांगतात 38 हजार कोटी येणे बाकी आहे, तर बाळासाहेब थोरात सांगतात 30 हजार कोटी येणे बाकी आहे. तर कोण म्हणतं 60 हजार कोटी बाकी आहेत. त्यामुळे आम्ही संभ्रमात आहोत. कारण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री वेगवेगळे आकडे सांगत आहेत. त्यांनी एकत्र येऊन ठरवले पाहिजे. किती पैसे येणार आहे, असा टोला बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

अंबरनाथ येथे मनसे पदाधिकारी राकेश पाटील यांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी शुक्रवारी कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील आणि माजी आमदार प्रकाश भोईर उपस्थित होते. राकेश पाटील हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधारला लवकरात लवकर अटक करावी तसेच उल्हासनगरमधील मनसे पदाधिकारी मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा, आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. (mns leader bala nandgaonkar on restart railway service)

संबंधित बातम्या:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात फोनवर संवाद!, राज्यपालांच्या भेटीबाबत चर्चा

Pune MNS Andolan | पुण्यात महागाईविरोधात मनसेचं आंदोलन

Ambernath Case | अंबरनाथ | मनसे शहर उपाध्यक्षाची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

(mns leader bala nandgaonkar on restart railway service)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.