मुस्लिम समाजातील ‘या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, मनसे नेत्याची मोठी मागणी

"ज्या लोकांना दोन बायका आहेत, ज्या लोकांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत, त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये. कारण या देशात लोकसंख्येचा स्फोट कधी ना कधी होणार आहे. अतिरिक्त लोकसंख्येचा भार, जे लोकं लोकसंख्या नियंत्रित करतात, दोन मुलांपेक्षा जास्त अपत्य वाढू देत नाहीत, त्यांचा कराचा पैसा, जे दोन पेक्षा जास्त अपत्य जन्माला घालतात त्यांच्यावर का खर्च करायचा?", असा सवाल मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे.

मुस्लिम समाजातील 'या' महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, मनसे नेत्याची मोठी मागणी
मनसे नेत्याची मोठी मागणी
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 6:18 PM

“मुस्लिम समाजात 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये”, अशी मागणी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज्य सरकारकडे केली आहे. “मुस्लिम समाजात एकापेक्षा जास्त पत्नी असलेल्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये”, अशीदेखील मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. “राहुल गांधी यांची अवस्था म्हणजे माँ माली, बाप तेली, बेटे निकले सय्यद अली अशी आहे. राहुल गांधी यांच्या हिंदू धर्माशी संबंध नाही. त्यांनी आमच्या धर्मावर बोलू नये”, असा घणाघात प्रकाश महाजन यांनी केला.

प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?

“ज्या लोकांना दोन बायका आहेत, ज्या लोकांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत, त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये. कारण या देशात लोकसंख्येचा स्फोट कधी ना कधी होणार आहे. अतिरिक्त लोकसंख्येचा भार, जे लोकं लोकसंख्या नियंत्रित करतात, दोन मुलांपेक्षा जास्त अपत्य वाढू देत नाहीत, त्यांचा कराचा पैसा, जे दोन पेक्षा जास्त अपत्य जन्माला घालतात त्यांच्यावर का खर्च करायचा? माझं स्पष्ट मत आहे की, ही योजना या लोकांना दिली तर विवाहित महिलेला दोन अपत्यांची अट असावी आणि एक पती आणि एख पत्नी असंच असावं. नाहीतर आपल्या इथे एका व्यक्तीला तीन-तीन पत्नी आहेत. त्या सर्वांना हा लाभ मिळू नये. त्यामुळे खरे गरजू मागे लागतील. माझा मुस्लिम धर्माकडे स्पष्ट इशारा आहे”, असं प्रकाश महाजन म्हणाले.

“राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आणि निर्बंध बोलू लागले आहेत. त्यांचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. ते हिंदू धर्मावर कशाला बोलतात? ते हिंदू नाहीत. हिंदू आई-बापाच्या पोटी जो जन्मतो तो हिंदू”, अशा शब्दांत प्रकाश महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय.

‘प्रकाश महाजन यांचं हे विधान चिप पब्लिकसिटी स्टंट’

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. “प्रकाश महाजन यांचं हे विधान चिप पब्लिकसिटी स्टंट आहे. मुळामध्ये या योजनेचा बॅकग्राऊंड पाहता ही योजना 21 ते 60 वयोगटासाठी आमच्या सरकारने काढलेली आहे. शासन सर्व स्तरातील महिलांना लाभ देणार आहे. प्रकाश महाजन सारख्या व्यक्तींची दखल घेणं महत्त्वाचं नाही. या देशामध्ये 85 टक्के हिंदू तर 15 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. मग केवळ मुस्लिम लोकसंख्या वाढते हे म्हणणे सबसे चुकीचे आहे. प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे”, अशी प्रतिक्रिया बाबाजानी दुर्रानी यांनी दिली आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.