Raj Thackeray News: हिंदूजननायक राजसाहब ठाकरे… काश्मीर पंडितांकडून पोस्टरबाजी; जम्मूत सभेचं लाईव्ह प्रक्षेपण होणार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. सत्ताधारी शिवेसना आणि राष्ट्रवादीवर या सभेतून राज ठाकरे घणाघाती हल्ला करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray News: हिंदूजननायक राजसाहब ठाकरे... काश्मीर पंडितांकडून पोस्टरबाजी; जम्मूत सभेचं लाईव्ह प्रक्षेपण होणार
हिंदूजननायक राजसाहब ठाकरे... काश्मीर पंडितांकडून पोस्टरबाजीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 2:42 PM

ठाणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. सत्ताधारी शिवेसना (shivsena) आणि राष्ट्रवादीवर (ncp) या सभेतून राज ठाकरे घणाघाती हल्ला करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी गुढीपाडव्याच्या सभेतून राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उचलला होता. त्यावरून बराच गदारोळ निर्माण झाला. स्वपक्षातील नेत्यांनाही राज यांचा हा निर्णय पचनी पडला नाही. त्यामुळे या मुद्द्यावरही राज ठाकरे आपली भूमिका विस्ताराने मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे काश्मीर पंडितांनाही राज ठाकरे यांची भुरळ पडली आहे. काश्मीर पंडितांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज ठाकरे यांचे पोस्टर लावले आहेत. त्यावर हिंदूजननायक राजसाहब ठाकरे असा उल्लेख केला आहे. तसेच राज यांच्या आजच्या सभेचे जम्मूतील काटरा येथे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळेही राज आज नेमकं काय बोलणार याची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे.

पोस्टरवर काय लिहिलंय?

जम्मू-काश्मीरमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे पोस्टर लागले आहेत. काश्मीर पंडितांच्या काश्मीर पंडित ग्रुप, हॉटेल रिजन्सी काटरा यांच्यावतीने हे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर राज ठाकरे यांचा भला मोठा फोटो आहे. त्यावर हिंदूजननायक राजसाहब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा लिहिली आहे. तसेच काटरा येथे राज यांच्या सभेचं संध्याकाळी लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. त्यामुळे राज यांच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाणे राजमय

दरम्यान, राज ठाकरे यांची आज ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या बाजूला सभा होणार आहे. या सभेसाठी रात्रीपासूनच जय्यत तयारी सुरू आहे. सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. तसेच सभेतील परिसर ते ठाणे स्टेशनपर्यंतच्या परिसरात राज ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. हा संपूर्ण परिसर राज ठाकरेमय झाला आहे. या सभेला ठाण्यासह मुंबई आणि नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीतून शेकडो मनसेसैनिक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

लाव रे तो व्हिडिओ पार्ट टू

दरमन्यान, राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून भाजप सरकारची पोलखोल केली होती. आजच्या सभेतही राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ पार्ट टू दाखवणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सभेत व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपही दाखवली जाणार आहे. मात्र, हे व्हिडीओ आघाडीतील पक्षाचे असतील, खासकरून शिवसेनेचे असतील असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे राज शिवसेनेची नेमकी कोणती पोलखोल करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

करारा जवाब मिलेगा; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी ‘मनसे’तून जोरकस चढाई…!

Kirit Somaiya: अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नॉट रिचेबल सोमय्यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले…

ठाण्यात भाजप-शिवसेनेला खिंडार; मयुर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.