Uddhav Thackeray: “21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, “वर्षा”तला शेवटचा दिवस?” मनसेचा खोचक सवाल

महाविकास आघाडी सरकारसह राज्यात राजकीय भूकंप झाला. तर ही सरकारमध्ये असणाऱ्या नाराजीमुळे तर शिवसेनेत असलेल्या नाराजीमुळेच घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले असताना सोशल मिडीयावरही याची जोरदार चर्चा रंग लागली आहे.

Uddhav Thackeray: 21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, वर्षातला शेवटचा दिवस? मनसेचा खोचक सवाल
वर्षा बंगलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 7:08 PM

मुंबई : आज 21 जून, हा दिवस जगभरामध्ये जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. तर आजचा हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस (The biggest day) म्हणून ही ओळखला जातो. कारण 24 तासांपैकी आजचा दिवस 13 तास 12 मिनिटांचा आहे. तर रात्र लहान आहे. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठीही आजचा दिवस हा मोठा ठरला आहे. माहाविकास आघाडी सरकार मधील नगरविकास मंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज शिवसेनेलाच नॉटरिचेबल होत झटका दिला आहे. तसेच हे सरकार नको. भाजपशी युती करा. मुख्यमंत्री तुम्हीच रहा मी होतं तसं शिवसेनेच्या गटनेतेपदावर रहातो असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र त्यानंतर शिंदे यांचा हा प्रस्ताव बाजूला सारत त्यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावर बाजूला करण्यात आले आहे. तर आता या पदावर अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्त करण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे नेते शिंदे यांची समजूत काढण्यासाठी गेले आहेत. पण आता नक्की काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहीलेले असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) आणि अमेय खोपकर यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी ट्वीट करत, 21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’ तला शेवटचा दिवस असे म्हटलं आहे.

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंडखोरी करत थेट आपण या सरकारमधून बाहेर पडू असेच म्हटलं आहे. शिंदे यांनी आपल्या सहकारी आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारसह राज्यात राजकीय भूकंप झाला. तर ही सरकारमध्ये असणाऱ्या नाराजीमुळे तर शिवसेनेत असलेल्या नाराजीमुळेच घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले असताना सोशल मिडीयावरही याची जोरदार चर्चा रंग लागली आहे. तर ट्वीटरवर ही टीव टीव होताना दिसत आहे. आजच्या शिवसेनेच्या नाराजी नाट्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी देखील ट्वीट केले आहे.

हे सुद्धा वाचा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टिका करताना याच्या आधी ही एक ट्वीट करत लक्षात आहे ना? राज साहेबांनी काय म्हटलं होतं…सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे. ज्यात 21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’ तला शेवटचा दिवस असे म्हटलं आहे.

तसेच मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी देखील असेच ट्वीट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. खोपकर यांनी आपल्याही ट्वीटमध्ये, 21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’ तला शेवटचा दिवस असे म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.