Mns : भाजपसोबत जाण्यावर चर्चा, मात्र स्वबळावर लढण्याच्या मनसे कार्यकर्त्यांच्या भावना

आगामी निवडणुकांत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली, मात्र स्वबळावर निवडणूका लढवाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची भावना होती. सर्व ठिकाणी पक्षाची परिस्थिती चांगली आहे. अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

Mns : भाजपसोबत जाण्यावर चर्चा, मात्र स्वबळावर लढण्याच्या मनसे कार्यकर्त्यांच्या भावना
राज ठाकरे देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 4:07 PM

मुंबई : राज्यात सध्या महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेनेही महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसे तितक्याच जोमाने उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे भाजपच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. आगामी निवडणुकीत भाजप मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत अनेक राजकीय जाणकारांनी दिले आहेत.

भाजपा सोबत जाण्याबाबतची चर्चा

आगामी निवडणुकांत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली, मात्र स्वबळावर निवडणूका लढवाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची भावना होती. सर्व ठिकाणी पक्षाची परिस्थिती चांगली आहे. अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसेचे महाराष्ट्रातील सर्व नेते आणि सरचिटणीस यांची 2 तास बैठक झाली. यात महापालिका निवडणुकीबाबत राणनितीवर चर्चा झाली.  आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विभागवार मेळावे, बैठका राज ठाकरे घेणार आहेत. त्याला 14 तारखेपासून सुरूवात होणार आहे.

‘कोरोनाकाळात मनसेचं काम चागलं’

कोरोनाकाळात मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काम केलं, हॉस्पिटल बिल कमी केली, यावेळी आमचे कार्यकर्ते कोरोना पॉझिटिव्ह होऊन काहींचा मृत्यू झाला असल्याचंही संदीप देशपांडे म्हणालेत. एसटी कर्मचारी संपात कर्मचाऱ्यांना राहण्या-खान्याबाबत मदत केली. या सरकारबाबत लोकांच्या मनात नकारात्मक भूमिका आहे. कोरोनाकाळ, परीक्षा, एसटी संप काहीच नीट धड भूमिका घेतली नाही, अशी टीका मनसेकडून करण्यात आली आहे.

एसटीबाबत सहाानुभूती दाखवली पाहिजे

एसटीच्या संपाबाबत बोलताना, एसटीबाबत सहानुभूती भूमिका दाखवली पाहिजे, महामंडळ कधीच फायद्यात येणार नाही.  पब्लिक ट्रान्सपोटबाबत विविध राज्यांनी चांगली भूमिका घेतली आहे. असंही मनसे नेते संदीप देशपांडे म्हणालेत.

Nagpur shocking खऱ्या समजून दिल्या खेळण्यातल्या नोटा, मित्रानेच का दिला साडेचार लाखांचा दगा?

Latur Market: सोयाबीनचे दर पुर्वपदावर, शेतकऱ्यांचा मात्र सावध पवित्रा

Dombivli Gang Rape | डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरण, 33 जणांविरुद्ध 885 पानी आरोपपत्र

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.