Raju Patil : पक्ष ज्यांनी पवारांच्या पायाशी नेऊन ठेवला, त्यांना आम्ही बोलायचं का फोटोग्राफरचा गळा घोटला?-राजू पाटील

संजय राऊतांना काही काम धंदे नाहीत. त्यांनी एकांतात भाष्य किंवा बडबड करण्याची सवय लावून घ्यावी, असं राज ठाकरेच मागे बोलले आहेत. त्यामुळे ते यांची प्रॅक्टिस करत असावेत, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Raju Patil : पक्ष ज्यांनी पवारांच्या पायाशी नेऊन ठेवला, त्यांना आम्ही बोलायचं का फोटोग्राफरचा गळा घोटला?-राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटलांचा खासदार संजय राऊत यांना टोलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 11:57 PM

डोंबिवली : स्वतःचा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या (Sharad Pawar) पायाशी नेऊन ठेवला, तेव्हा आम्ही बोलायचं का यांनी फोटोग्राफरचा (Cm Uddhav Thackeray) गळा घोटला? असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज लगावला. आज मनसे आमदार राजू पाटील यांच्या माध्यमातून ठाकुर्लीतील कचोरे गाव आणि डोंबिवलीतील आजदे गाव याठिकाणी आमदार निधीतील विकास कामांचं भूमीपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत आणि उत्तर प्रदेश मधील भाजप खासदार यांना टोला लगावला. संजय राऊतांना काही काम धंदे नाहीत. त्यांनी एकांतात भाष्य किंवा बडबड करण्याची सवय लावून घ्यावी, असं राज ठाकरेच मागे बोलले आहेत. त्यामुळे ते यांची प्रॅक्टिस करत असावेत, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते शिवसेना खासदार संजय राऊत?

बाळासाहेब ठाकरे हे आधी प्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. बाळासाहेबांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले. त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रकला पुढे जाईल, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र, दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाने त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटला आहे, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंसह भाजपवर निशाणा साधला. जागतिक व्यंगचित्रकला दिनाचं निमित्त साधत ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोणी कितीही भोंगे वाजवले तरी शिवसेनेला फरक पडत नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या राजकारणामुळे आज हिंदुंनादेखील त्रास होत असल्याने लाखो हिंदुंनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक मंदिरांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे राज यांनी सुरू केलंलं मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण हिंदुंच्याच गळ्याशी आलं असल्याचंही राऊत म्हणाले.

मनसे आमदारांचं उत्तर

दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनाही उत्तर दिलं आहे. त्यांची मागणी हास्यास्पद आहे. त्यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीय महासंघापुढे केलेलं भाषण ऐकावं. त्यांना एखाद्याने पुढे केलेलं असावं अथवा त्यांचं ते वैयक्तिक मत असेल आणि राज साहेबांना माफी मागितल्यावर प्रवेश देऊ, अश्या वल्गना कोणी करू नये, असं राजू पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले होते बृजभूषण शरण सिंह?

उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांनी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश दिला जाईल, असं ते म्हणाले होते.

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.