चार-पाच तास वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण, पोलीसही हतबल, अखेर मनसे आमदाराकडून पुढाकार

कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील हे स्वत:हून रस्त्यावर उतरले आहेत (MNS MLA Raju Patil working for Kalyan Shil road traffic).

चार-पाच तास वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण, पोलीसही हतबल, अखेर मनसे आमदाराकडून पुढाकार
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 8:43 PM

ठाणे : कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनसेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेत आजपासून (28 ऑक्टोबर) ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु केला आहे. या आठवड्याभरात मनसेने नेमलेले 30 वॉर्डन कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम पार पाडणार आहेत. सत्ताधाऱ्यांकडून काही उपाययोजना केली जात नसल्याने मनसेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे (MNS MLA Raju Patil working for Kalyan Shil road traffic).

कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी चार ते पाच तास अडकून राहतात. रेल्वे सेवा बंद असल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या भागातून हजारो चाकरमानी ठाणे, नवी मुंबई, मुंबईला कामाला जातात. त्यांचा जास्त वेळ हा शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीतच जातो.

कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी काँक्रिटीकरण सुरु आहे. या कामाच्या कंत्राटदाराकडून सुरक्षिततेचे योग्य नियम पाळले जात नाहीत. त्याचा प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा फटका बसत आहे (MNS MLA Raju Patil working for Kalyan Shil road traffic).

कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील हे स्वत:हून रस्त्यावर उतरले होते. त्यांनी वाहतूक कोंडी प्रकरणी वाहतूक पोलिसांना चांगले फैलावर घेतले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या मनुष्यबळ कमी आहे, वॉर्डनची संख्या कमी आहे, मागणी करुन ही वॉर्डन मिळत नाही, अशी अडचण पोलिसांनी सांगितली होती.

कल्याण शीळ रस्त्यावर अवजड वाहनांना पोलीस वाहन चालकाकडून पैसे घेऊन सोडतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. या घटनेचा पर्दापाश करण्यासाठी मनसेने एका गाडीचा पाठलाग करुन चालकाकडून हे सत्य वदवून घेतले होते. त्याचा व्हिडीओ मनसेने सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता पाहता मनसेने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मनसेचे या रस्त्यावर आजपासून ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु केला आहे. या सप्ताहात मनसेच्यावतीने 30 वॉर्डन शीळ ते पलावा दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतील. हे वॉर्डन सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करणार असल्याचे मनसेचे पदाधिकारी चिन्मय मडके यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : कल्याण-शीळ फाट्यावर 6-6 तास कोंडी, दोन दिवसात ट्रॅफिक सुरळीत करा, मनसेचा अल्टिमेटम

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.