Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त, यशस्वी उपचारानंतर चाचणी निगेटीव्ह
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांची आज (29 ऑक्टोबर) चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये ते कोरोनामुक्त असल्याचे समजले. राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहीणदेखील कोरोनामुक्त झाल्या आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांची आज (29 ऑक्टोबर) चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये ते कोरोनामुक्त असल्याचे समजले. राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहीणदेखील कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील परकार यांनी ही माहिती दिलीय.
राज ठाकरे कोरोनामुक्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 23 ऑक्टोबर रोजी समोर आले होते. त्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते. आज दुपारी त्यांची पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधक चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज संध्याकाळी आला. यामध्ये राज ठाकरे कोरोनामुक्त झाल्याचे समजले. गेल्या शुक्रवारी कुंदाताई ठाकरे यांना तरे गेल्या शनिवारी राज ठाकरे आणि जयजयवंती देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी यापूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मेळावे पुढे ढकलले
सध्या सर्वच पक्ष महापालिका निवडणुकीची तयारी करत आहेत. पक्षबांधणी तसेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याकडे भर दिला जात आहे. मनसेनेदेखील मेळावे, बैठका सुरु केल्या आहेत. 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे मुंबई आणि पुण्यात कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. मात्र राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर हे मेळावे पुढे ढकलण्यात आले होते.
कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही
दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नव्हता. कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांनी पुणे तसेच मुंबई येथे अनेकदा कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. फक्त पुणे आणि मुंबईच नाही तर नाशिकचाहीदौरा राज ठाकरेंनी केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नव्हता. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.
इतर बातम्या :
India vs New zealand : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धडकी, भारताचं ‘हे’ त्रिकुट उडवणार दाणादाणhttps://t.co/HjjDoWodKy#IndiaVsNewZealand | #T20WorldCup | #IndianCricketTeam
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 29, 2021