Raj Thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात परळी कोर्टाचा अटक वॉरंट, 2008 मधील एसटी बस दगडफेक प्रकरणी कारवाई

2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेस वर दगडफेक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात परळी कोर्टाचा अटक वॉरंट, 2008 मधील एसटी बस दगडफेक प्रकरणी कारवाई
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 1:24 PM

संभाजी मुंडे, टीव्ही9 मराठी, परळी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात बीडमधील परळी कोर्टाने अटक वॉरंट बजावला आहे. जामीन करुनही सतत तारखांना गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे.

जवळपास 13-14 वर्ष जुन्या खटल्यात आजही राज ठाकरेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आठ वर्षांपूर्वी बीडमधील अंबाजोगाईत मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सुनावणीला हजर राहत नव्हते.

दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी सहा वर्षांपूर्वी अंबाजोगाईत हजेरी लावली होती. न्यायालयात जाऊन त्यांनी त्यावेळी तीनशे रुपयांचा दंड भरत अटक वॉरंट रद्द केले होते. या प्रकरणी परळी न्यायालयाने जामीन दिला.

काय आहे प्रकरण?

रेल्वेत परप्रांतीयांचीच भरती केली जात असल्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले होते. अंबाजोगाईत मनसैनिकांनी एसटी बसेसवर दगडफेक करून महामंडळाचे नुकसान केले होते.

अंबाजाेगाई शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरेंना जामीन मिळाल्यांनतर ते अंबाजोगाई न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे अंबाजोगाई न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. राज ठाकरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. माने यांच्या न्यायालयासमोर हजर झाले असता तीनशे रुपये दंड घेऊन त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

अंबा साखर कारखाना पवारांच्या घशात घालण्याचा डाव, माजी आमदार माणिक जाधव यांचा आरोप

आमदार बायकोने मेसेज पाठवला, ‘पत्नीशी पुन्हा प्रेमाने वागा’, खासदार धानोरकरांनी थेट स्टेटसच ठेवलं

बाहेरुन पाठिंबा चालेल का? पंकजांचा प्रश्न, रोहित पवार म्हणतात, आताचं सेशन बघता भाजपचा बाहेरुन पाठिंबा वाटतोय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.