‘मनसे हा परिवार, सहज तुटणार नाही’, 320 पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर राजू पाटालांचं मोठं विधान

"मनसे हा परिवार आहे. तो सहज तुटणार नाही. नाराजीतून पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याच्या घटना घडत असतात", अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली. (MNS Raju Patil on 320 MNS leaders resignation)

'मनसे हा परिवार, सहज तुटणार नाही', 320 पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर राजू पाटालांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 6:33 PM

कल्याण (ठाणे) : “मनसे हा परिवार आहे. तो सहज तुटणार नाही. नाराजीतून पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याच्या घटना घडत असतात. अशा प्रकारच्या घटना प्रत्येकल पक्षात घडतात. आम्ही या घटनेची दखल घेतली आहे”, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली. पत्रीपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राजू पाटील आले होते. यावेळी प्रसारमाध्यामांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं (MNS Raju Patil on 320 MNS leaders resignation).

कल्याणमध्ये मनसेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी सरसकट आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. माजी नगरसेवक अनंता चंदर गायकवाड यांनी मनसेत पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाकडून कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं आहे. पक्षात गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या प्रकरणावर राजू पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

“आम्ही काही नियुक्त्या केल्या होत्या. त्याबाबत पक्षात नाराजी होती. पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिलेले नाहीत तर पदाचे राजीनामे दिले आहेत. राज ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे. त्यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ दिलेली आहे. नक्कीच त्यावर तोडगा निघेल”, असं राजू पाटील यांनी सांगितलं (MNS Raju Patil on 320 MNS leaders resignation).

‘नियोजन न करता पूल पाडल्याने विलंब’

“पत्रीपुलाचं उद्घाटन झालं, याचा आनंद होतोय. पत्रीपुलाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त शोधत कुणी बसलं नाही, याचाही आनंद झाला. कारण लोकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. रस्ते बाधितांनाही न्याय मिळेल”, असं आश्वासन पाटील यांनी दिलं. “कोणतंही नियोजन न करता पूल तोडले गेले. त्याच्यामुळे बांधकामाला विलंब लागला. आधी सर्व तयारी करायला हवी होती”, असंदेखील राजू पाटील यावेळी म्हणाले.

‘सरकारला दखल घ्यावी लागेल’

राजू पाटील यांनी यावेळी शेतकरी आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. “केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी आणि कामगारांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. कोरोनाच्या नावाखाली आंदोलने दडपली जात आहे. मात्र, ही आंदोलन उग्र झाल्यास सरकारला शेवटी याची दखल घ्यावीच लागेल”, असं मत त्यांनी मांडलं.

नितीन गडकरींची भेट का घेतली?

“2005 ते 2010 या काळात माजी आमदार हरिशचंद्र पाटील यांनी डोंबिवली ते मुंब्रा हा रेल्वे समांतर रस्ता व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले होते. तो प्रस्ताव एमएमआरडीएकडे गेला. हा प्रस्ताव एमएमआरसीकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी एका संस्थेला अहवाल काढण्याचं काम दिलं होतं. त्या संस्थेने 92 ते 93 कोटींचं बजेट तयार केलं होतं. मात्र, त्यानंतर तो प्रस्ताव पुढे सरकला नव्हता. सध्याच्यी आर्थिक स्थिती पाहता राज्य सरकार हा रस्ता तयार करेल असं वाटत नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली”, असं राजू पाटील यांनी सांगितलं

संबंधित बातमी : कल्याणमध्ये मनसेला मोठा झटका, 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, महापालिका निवडणुकीआधी राजकारण तापलं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.