लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेने पदवीधर निवडणुकीसाठी जाहीर केला उमेदवार

लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेने पदवीधर निवडणुकीसाठी मात्र आपला उमेदवार जाहीर केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. मनसेचे उमेदवार अभिजीन पानसे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेने पदवीधर निवडणुकीसाठी जाहीर केला उमेदवार
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 8:47 PM

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. विधानपरिषदेसाठी मनसेने अभिजीन पानसे यांना संधी दिली आहे. अभिजीत पानसे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटले की, राज ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी ही निवडणूक लढवण्याची मला संधी दिली. आम्ही पहिल्यापासून यावर काम करत होतो. ही नोंदणी प्रक्रिया होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोंदणी देखील आमची झालेली आहे. पदवीधर मतदारसंघातून येणारा जो आमदार असेल त्यांनी पदवीधरासाठी काहीतरी काम केलं पाहिजे असं म्हटलं जातंं.

निरंजन डावखरे यांना टोला

मला कोणाचा इतिहास काढायचा नाही मात्र गेले दोन टर्म 12 वर्षे पदवीधरांचा आमदार असून पदवीधरांसाठी केलं काय?. अभिजीत पानसे यांनी निरंजन डावखरे यांना सवाल केला आहे. शिक्षणाचा आम्हाला अनुभव आहे. आमची संस्था आहे त्यामुळे रोजगार कसा मिळेल या सर्व विषयातील आम्ही लोक आहेत. आमच्याकडे रोड मॅप आहे. मतदान नोंदणी आहे त्यामुळे आम्ही विजयाची गुढी उभारणार आहे.

राज साहेबांनी भूमिका स्पष्ट होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा व्हावे. यासाठी विनाशर्त आम्ही पाठिंबा देत आहोत. त्यामुळे तो पाठिंबा मोदीजींना होता. सक्षम देशाचा पंतप्रधान व्हावा म्हणून तो पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात ही स्पष्ट केले होते येणाऱ्या प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लढवणार आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही नाही लोकसभेला आमचा बिनशर्त पाठिंबा होता. आमचा स्वतःचा स्वतंत्र पक्ष आहे.

‘पूर्णपणे ताकतीने या निवडणुकीत आम्ही उतरलेलो आहे आमच्याकडे नोंदणी कार्यकर्ते आणि लोकसभेच्या माध्यमातून रंगीत तालीम देखील झालेली आहे. कोणाचा पाठिंबा मिळो किंवा न मिळो आमचा विजय निश्चित आहे. आम्ही विजया करता लढतोय आणि आम्ही जिंकणारच. त्यांनी पाठिंबा द्यावा हा त्यांचा प्रश्न पण असं होणार असेल तर हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे.’

‘पदवीधर निवडणूक ठराविक लोकांपर्यंत ठराविक नोंदणी होते आणि जो निवडून आलेला असतो त्यांनी रेट कार्ड बनवलेला आहे. पानसे यांचा डावखरे यांच्यावर आरोप आहे. पदवीधर यांना गृहीत धरत असाल तर या वेळेला पदवीधरांनी विचारपूर्व मतदान करावे लागेल. पदवीधर संघातून निवडून आल्यावर काय करायला पाहिजे काय केले तुम्ही. आपल्या पदवीधर मतदारसंघात केरळपासून लोक येऊन मच्छीचे धंदे करतात आणि आपली लोक त्या ठिकाणी भांडी घासायची का?. राज्याच्या मस्य धोरण ठरवताना रत्नागिरी विद्यालयाचं नावच नव्हतं मी पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्या दिवशी ते नाव ऍड करून दिलं.’

‘लोकांना फक्त कोकणाचा आंबाच माहिती बाकी काहीही माहिती नाही. कुठल्या गोष्टी प्लॅनिंग केलं नाही तर या भागातले विद्यार्थी आणि तरुण शहराकडे धावतील. यामुळे सगळं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याच कारणाने आमचा वचननामा नाही आणि जाहीरनामाही नाही आमचा रोजगार येणार तोही दहा दिवसात आम्ही सादर करणार. शिंदेच्या शिवसेनेने पण उमेदवार दिला तरी चालेल सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार आहे मतदार ठरवतील.’

‘लोकसभेमुळे आमचे कार्यकर्ते चार्ज झालेले आहे. माझी उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर रत्नागिरी पासून सगळीकडेच कार्यकर्ते कामाला लागलेत. आम्ही विजया करता निवडणूक लढतो आणि आमचा विजय होणार म्हणूनच आम्ही लढवतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक जिंकणार आणि विधान परिषदेत आमचा एक आमदार जाणार आहे.’

‘राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर भूमिका स्पष्ट केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हा पाठिंबा होता आणि तो लोकसभेत फक्त मर्यादित होता. आम्ही युतीचे घटक पक्ष नाही. आमचा पाठिंबा फक्त लोकसभेसाठी होतं. विधान परिषद निवडणूक हे आम्ही लढणारच.’

मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, प्रत्येक पक्ष वेगवेगळा असतो, आम्ही महायुतीत जरी असलो तरी हा पक्षाचा विषय आहे, आम्ही उमेदवारी जाहीर केली असेल तर काही तरी विचार करुन जाहीर केली असेल. येणाऱ्या निवडणुकांच्या जागेवर आता बोलणं उचित नाही. 4 जूननंतर काय निकालाची परिस्थिती आहे. राज्याची परिस्थिती आहे यावर बरीचशी गणित अवलंबून आहेत.

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.