Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Cabinet reshuffle : खासदार कपिल पाटील यांचं केंद्रीय मंत्रिपद निश्चित, कसा आहे पाटलांचा राजकीय आलेख?

भिवंडीचे खासदार कपील पाटील यांचं नाव समोर आल्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात त्यांच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

Modi Cabinet reshuffle : खासदार कपिल पाटील यांचं केंद्रीय मंत्रिपद निश्चित, कसा आहे पाटलांचा राजकीय आलेख?
खासदार कपिल पाटील
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 5:17 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात 43 नवे मंत्री शपथ घेणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील 4 खासदारांना संधी मिळाली आहे. नव्या मंत्र्यांमध्ये नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. भिवंडीचे खासदार कपील पाटील यांचं नाव समोर आल्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात त्यांच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. (MP Kapil Patil will get a place in the Union Cabinet)

कपील पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पुढे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 व 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास

जन्म – 5 मार्च 1961 जन्मगाव – हायवे दिवे ता.भिवंडी शिक्षण – बी ए मुंबई विद्यापीठ सरपंच – 1988 – 1992 ग्रामपंचायत दिवे अंजुर सदस्य – 1992 – 1996 पंचायत समिती भिवंडी सभापती – 1997 पंचायत समिती भिवंडी सदस्य – 2002 – 2007 जिल्हा परिषद ठाणे सभापती – 2005 – 2007 जिल्हा परिषद कृषी समिती अध्यक्ष – 2009 – 2012 जिल्हा परिषद ठाणे अध्यक्ष – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे सतत 2010 – 2011 आणि 2011 – 2012 या दोन वर्षात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार कपिल पाटील यांच्या कार्यकाळात प्राप्त झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात कपिल पाटिल यांना भाजपकडून बळ

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या फारकतीमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून कपिल पाटील यांना संधी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत पाटील यांना राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय व आर्थिक सामना करावा लागेल. पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ठाणे शहरात व अन्य काही शहरात भाजपकडे आश्वासक चेहरा नाही. पाटील यांच्या रुपाने ती गरज पूर्ण होईल, असं बोललं जात आहे.

या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश

नारायण राणे सर्बानंद सोनोवाल डॉ. विरेंद्र कुमार ज्योतिरादित्य सिंधिया रामचंद्र प्रसाद सिंग अश्विनी वैष्णव पशुपती कुमार पारस किरेन रिजीजू राजकुमार सिंह हरदीप सिंह पुरी मनसुख मंडाविया भुपेन्द्र यादव पुरुषोत्तम रुपाला जी. किशन रेड्डी अनुराग सिंह ठाकूर अनुप्रिया सिंह पटेल डॉ. सत्यपाल सिंह बघेल राजीव चंद्रशेखर शोभा करंडलाजे भानूप्रताप सिंग वर्मा दर्शना विक्रम जरदोष मीनाक्षी लेखी अनपुर्णा देवी ए. नारायण स्वामी कौशल किशोर अजय भट्ट बी. एल. वर्मा अजय कुमार चौहान देवूसिंह भागवत खुपा कपिल पाटील प्रतिमा भौमिक डॉ. सुभाष सरकार डॉ. भागवत कराड डॉ. राजकुमार सिंह डॉ. भारती पवार बिस्वेश्वर तडू शंतनु ठाकूर डॉ. मुंजपारा महेंद्रभाई जॉन बरला डॉ. एल. मुरगन निसित प्रमाणिक

संबंधित बातम्या :

Modi Cabinet Reshuffle: संभाव्य चर्चेला पूर्णविराम, महाराष्ट्रातून 4 नेते मंत्रीपदी, राणे, कराड, पवार, पाटलांना संधी, 43 मंत्र्यांची अधिकृत यादी एका क्लिकवर

Modi Cabinet Reshuffle: कोण मंत्री होणार यापेक्षा कोण घरी गेलं याचीच चर्चा जास्त; 12 मंत्र्यांना हटवलं

MP Kapil Patil will get a place in the Union Cabinet

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.