Video | फडणवीसांवर मोदींची स्तुतीसुमने; पुणे मेट्रोसाठी लावलेल्या तगाद्याचे हसून कौतुक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुळा-मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी 1100 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू होतोय. वेगवान विकासासाठी आणि आतापर्यंत केलेल्या कामासाठी पुणे प्रशासनाचे आणि पालिकेचे आणि अभिनंदन करतो म्हणत त्यांनी कौतुक केले.

Video | फडणवीसांवर मोदींची स्तुतीसुमने; पुणे मेट्रोसाठी लावलेल्या तगाद्याचे हसून कौतुक!
नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस.
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 2:07 PM

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज पुणे (pune) दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) उद्घाटन केले. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले. पुणे मेट्रोसाठी त्यांनी कसा तगादा लावला, असे हसत-हसत सांगितले. त्यावर फडणवीसही गालातल्या गालात हसले. एकीकडे मोदींच्या उपस्थितीमध्ये अजित दादांनी जोरदार फटकेबाजी करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तक्रारच त्यांच्याकडे केली. मोदींचा पुणे दौरा नाना कारणांनी गाजत आहे. त्यात ते पुण्यात येणारे पहिले की दुसरे पंतप्रधान असो की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतलेली आक्रमक भूमिका. एकंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सारेच सक्रिय झाले आहेत.

मोदींनी काय केले कौतुक?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मट्रोसाठी देवेंद्र फडणवीस यांनी कसे योगदान दिले याचे जाहीर कौतुक आपल्या भाषणातून केले. मोदी म्हणाले की, पुण्याने शिक्षण, संशोधन, आयटी, बिझनेसमध्येही आपली ओळख मजबूत केली आहे. अशात आधुनिक सेवा सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहेत. आमचे सरकार पुण्याची गरज ओळखून काम करते आहे. मी आज आनंदनगरपर्यंत प्रवास केला. ही मेट्रो पुण्यातील मोबिलिटी अधिक सोपी करेल. प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होईल. राहणे आणखी सोपे होईल, असा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा ते या प्रोजेक्टला घेऊन सारखे दिल्लीला यायचे. खूप मागे लागले होते, या प्रोजेक्टसाठी. त्यांच्या प्रयत्नांचेही हे यश आहे. त्यांचेही अभिनंदन, म्हणत त्यांनी फडणवीसांचे कौतुक केले.

पालिकेच्या पाठीवर थाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बाबासाहेब पुरंदेरांचींही मी आठवण काढतोय. शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्या मनात सदासर्वदा वसणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा युवा पिढीत राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवते. आज पुण्याच्या विकासात जोडलेल्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झालंय. माझ्य सौभाग्य आहे की पुणे मेट्रेच्या भूमिपुजनासह लोकार्पणसाठीही मला संधी दिली. नरेंद्र मोदी म्हणाले की, मुळा-मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी 1100 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू होतोय. वेगवान विकासासाठी आणि आतापर्यंत केलेल्या कामासाठी पुणे प्रशासनाचे आणि पालिकेचे आणि अभिनंदन करतो म्हणत त्यांनी कौतुक केले.

इतर बातम्याः

Video | पंतप्रधान मोदींचा दिव्यांगांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास; दिलखुलास गप्पांचा फडही रंगला…!

नागपूरची मेट्रो वेगाने झाली, पिंपरी-ठाणेसाठी मदत करा; अजित पवारांची मोदींना राजकारण न करण्याची ग्वाही

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.