महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालावर मोदींनी पुन्हा दिला ‘एक है तो सेफ है’ चा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित केले. महाराष्ट्रातील जनतेने महाविकासआघाडीला त्यांची जागा दाखवली आहे. त्यांनी संपूर्ण देशाला एकच संदेश दिला आहे की, देशात एकच संविधान चालेल. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर देखील टीका केलीये.

महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालावर मोदींनी पुन्हा दिला 'एक है तो सेफ है' चा नारा
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 8:53 PM

PM Modi on maharashtra election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. मोदींनी महाराष्ट्राचा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. जय भवानीच्या घोषाने पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली. मोदी म्हणाले की, ज्यांना महाराष्ट्राची माहिती आहे, त्यांना हे कळेल की, तिथे आपण ‘जय भवानी’ म्हणतो तेव्हा ‘जय शिवाजी’चा नाराही एकाच वेळी गुंजतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात ‘महाविजय’ साजरा करत आहोत. आज महाराष्ट्रात ‘विकासाचा विजय झाला आहे. सामाजिक मूल्यांचाही विजय झाला आहे. राज्यात लबाडी आणि विश्वासघाताचा पराभव झाला आहे. आज नकारात्मक राजकारण आणि घराणेशाहीचा पराभव झालाय.

गेल्या ५० वर्षांतील कोणत्याही पक्षाचा आणि आघाडीचा हा सर्वात मोठा विजय आहे. महाराष्ट्रात भाजपचा हा सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा विजय आहे. सलग तिसऱ्यांदा भाजपला जनादेश मिळाला आहे. गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा आणि अगदी बिहारमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपची सरकारे निवडून आली आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘काँग्रेस आणि आघाडीचे कोणतेही खोटी आश्वासने चालली नाही. आज महाराष्ट्रातील जनादेशाने आणखी एक संदेश दिला आहे की, संपूर्ण देशात एकच संविधान चालेल. ते संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान. जे लोकं देशात दोन संविधानाची भाषा करतील त्यांना देश नाकारेल. काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण महराष्ट्राने त्यांना संदेश दिलाय की हे नाही चालणार. जगातील कोणतीही ताकद कलम ३७० परत लागू करु शकणार नाही.’

पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, इंडिया आघाडी ही समाजात जाती आणि धर्माच्या नावावर फूट पाडते. या निवडणुकीने आणि हरियाणाच्या निकालाने दाखवून दिले आहे की लोकांना कोण बरोबर आहे हे कळतं. महाराष्ट्राचा निर्णय केवळ 2024 चा नाही, तर 2019 मध्येही मिळाला होता. पण तेव्हा उद्धव यांचे सत्तेवरील आंधळे प्रेम आणि विश्वासघात जिंकला होता. आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.

नड्डा म्हणाले की, ज्या लोकांनी देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला ते निवडणूक हरले आहेत. काँग्रेसवर निशाणा साधत नड्डा म्हणाले की, काँग्रेस आघाडी जाती आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडेल या भ्रमात आहे. पंतप्रधानांनी जगभरात आपली छाप सोडली आहे, विशेषत: तीन देशांच्या भेटीनंतर. मोदींनी पाठवलेल्या संदेशाचे जगाने कौतुक केले आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....