Weather Alert: मान्सूनचा पाऊस वेशीवर दाखल; कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी

रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग हे मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत आहेत. | Monsoon Rain

Weather Alert: मान्सूनचा पाऊस वेशीवर दाखल; कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी
प्रतिकात्मक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 11:03 AM

रत्नागिरी: केरळमध्ये मान्सुन दाखल झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सुन दाखल होण्याची अनेक जण वाट पहायतायत. सध्या अरबी समुद्रात मान्सुन सक्रीय होण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या (Monsoon) आगमनाचे संकेत मिळतायत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पहायला मिळतेय. तर मतलई वारे सुद्दा सध्या वेगाने वाहतायत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग हे मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत आहेत. (Monsoon rain expected soon in Konkan Area)

सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसत आहे. मुंबई आणि उपनगराच्या परिसरात बुधवारी सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काल मुंबईत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. आजदेखील सकाळपासून हलकासा पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मात्र, मान्सूनचा पाऊस मुंबईसह राज्यभरात कधी येणार, याची प्रतिक्षा आता सर्वांना लागली आहे.

कराडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस

कराड शहर व आसपासच्या परिसरात मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरुन राहिले होते. मलकापुर कराड परिसरात घरामध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. रस्ते व गटारामधुन मोठे पाणी वाहत होते ग्रामीण भागात शेतातील बांध फुटून पाणी वाहत होते. ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाचा सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनाही बसला आहे कराड गोटे येथील निवासस्थानी जोरदार पाऊसाचे पाणी भरल्याने त्यांच्या कार्यालयासह निवासस्थान जलमय झाले होते.

वसई विरारमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

वसई विरारमध्ये मंगळवारी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दुपारपासून वसई विरारमध्ये ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी सात नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक बरसलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. वसई तालुक्यात पावसाच्या रिमझिम आणि जोरदार सरी बरसल्या आहेत.

काल हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाच्या सरी बरसण्याचा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून वसई, विरार नालासोपारा सह पालघर जिल्ह्यात , जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच मान्सून पूर्व पावसाने वसई विरार नालासोपारा शहरातील अनेक सकल भागात पाणी साचले असल्याने पावसाळ्या पूर्वीच्या कामाची या पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे.

विरार पूर्व चंदनसार साईनाथ नगर परिसरातील विरार फाट्याकडे जाणारा मुख्य रस्ता, नालासोपारा पूर्व आचोले मुख्य रस्ता, सेंट्रल पार्क, टाकीपाडा रस्ता हे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते. रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाणाऱ्या पादचारी आणि वाहनधारकांना मात्र याच पाण्यातून मार्ग काढत कसरत करावी लागली आहे. विरार पूर्व चंदनसार साईनाथ नगर परिसरातील विरार फाट्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील व नालासोपारा पूर्व आचोले रस्त्यावर पाणी साठले होते.

(Monsoon rain expected soon in Konkan Area)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.