Monsoon Update 7 June 2022 : आजपासून पावसाची शक्यता, कोणकोणत्या भागाला यलो अलर्ट? जाणून घ्या
सुरूवातीला हवामान विभागाकडून तळकोकणामध्ये 5 जूनपर्यंत साधारण मान्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, 7 पर्यंत देखील तळकोकणामध्ये मान्सून दाखल झालेला नाहीये. कारण राज्यातील हवामान मान्सूनसाठी योग्य नसल्यामुळे मान्सून आला नाही. पण मंगळवारी मान्सूनसाठी हवामान योग्य असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे.
मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून राज्यामध्ये मान्सूनची (Monsoon) वाट बघितली जातेय. मात्र, दरवेळी प्रमाणे यंदाही मान्सून चकवा देताना दिसतो आहे. साधारण 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून राज्यामध्ये दाखल होण्याची शक्यता होती. परंतू अद्यापही राज्यामध्ये मान्सून आला नाही. मंगळवारपासून (Tuesday) मृग नक्षत्रावर मान्सूनपूर्व पाऊस अनेक भागांमध्ये कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यातील लोक मान्सूनची वाट पाहात आहेत. आता हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केल्यामुळे साधारण 7 ते 10 जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण सध्या हवामानामधील (Weather) स्थिती पावसासाठी अनुकूल आहे.
आज मान्सून तळकोकणामध्ये दाखल होण्याची शक्यता
सुरूवातीला हवामान विभागाकडून तळकोकणामध्ये 5 जूनपर्यंत साधारण मान्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, 7 पर्यंत देखील तळकोकणामध्ये मान्सून दाखल झालेला नाहीये. कारण राज्यातील हवामान मान्सूनसाठी योग्य नसल्यामुळे मान्सून आला नाही. पण मंगळवारी मान्सूनसाठी हवामान योग्य असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे. सोमवारी हवेचा दाव अनुकूल झाल्याने वाष्पयुक्त वारे वाहत असल्याचे हवामान विभागाने प्रसारित केलेल्या फोटोमध्ये दिसते आहे.
कर्नाटकातील कारवार भागामध्ये मान्सून
मान्सून सध्या कर्नाटकातील कारवार आणि धर्मपुरी याठिकाणी आहे. राज्यातील थोडासा हवेचा दाव कमी झाला की, मान्सून राज्यामध्ये दाखल होईल. सध्या कर्नाटकातील कारवार भागात मान्सून दाखल झाला आहे. साधारण मंगळवारपासून कोकणह मराठवाड्यातील काही भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस येण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच पेरणीसाठी शेतकरी देखील पावसाची वाट पाहात आहेत. 4 जूनला येणारा मान्सून अद्याप न आल्याने चिंतेचे वातावरण सध्या राज्यामध्ये आहे.
इतके मिमी पाऊस पडण्याची यंदा शक्यता
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून नेहमीप्रमाणेच राहिल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यावर्षी जून आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये 880.6 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. यावर्षी संपूर्ण देशामध्ये सरासरी पाऊस पडण्याची शक्यता अगोदरच हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार देशामध्ये 40 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान खात्याचा अंदाज इतपत योग्य ठरेल हे सांगणे थोडे अवघड आहे. कारण हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे राज्यामध्ये मान्सून साधारण 4 जूनपर्यंत दाखल होणार होता. परंतू अद्यापही मान्सूनचा काही पत्ता नाहीये. यामुळे शेतकरीही हवालदिल झाल्याचे दिसते आहे.