हजार विद्यार्थ्यांची फी माफ, 500 विद्यार्थ्यांना सांगितलं, ‘देता येईल तेवढीच द्या’, मुंबईतील ‘श्रीमंत’ मनाचा शाळा मालक!

कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून महाराष्ट्रासह देशातील शाळा जवळपास बंदच आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आणि विद्यार्थी हा शिक्षणापासून दूर जाऊ नये.

हजार विद्यार्थ्यांची फी माफ, 500 विद्यार्थ्यांना सांगितलं, 'देता येईल तेवढीच द्या', मुंबईतील 'श्रीमंत' मनाचा शाळा मालक!
हुसेन शेख
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 3:45 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून महाराष्ट्रासह देशातील शाळा जवळपास बंदच आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आणि विद्यार्थी हा शिक्षणापासून दूर जाऊ नये. याकरिता सर्वत्र ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू झाले. 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी शाळेमध्ये गेले नाहीत. सर्वांचे ऑनलाईन शिक्षण मात्र, सुरूच आहे. मात्र दुसरीकडे या काळात कोरोना विषाणू संसर्गामुळं पालकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींचे पगार कमी करण्यात आले. (Mortgaging wifes jewelry hussain sheikh waived fees-of 1000 school children example of humanity)

विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू

शाळांनी जरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले तरी देखील यादरम्यान फी भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावला. अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांना फी भरणे शक्य नसल्यामुळे अनेक विद्यार्थांना या काळात शिक्षणापासून वंचित राहवे लागले. दररोज बातम्या येत होत्या की, फी भरण्यावरून अमुक-अमुक शाळेत पालकांच शाळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. शाळा प्रशासन आणि पालकांमधील वाद तर शिगेला पोहचला होता. मात्र, या सर्वांना मुंबईतील एक शाळा अपवाद ठरली आहे. या शाळेच्या मालकाने हजार विद्यार्थ्यांची फी माफ करत एक नवा आदर्श जगाच्या समोर निर्माण केला आहे.

शाळेतील 65% विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ

विशेष म्हणजे या मुलांची फी माफ करण्यासाठी यांनी बायकोचे दागिने घाण ठेवले आहेत. मुंबईतील मालवणी भागातील होली स्टार इंग्लिश स्कूलच्या मालकाने आपल्या शाळेतील 65% विद्यार्थ्यांकरिता संपूर्ण वर्षाची फी माफ केली आहे. शाळेच्या मालकाचे नाव हुसेन शेख (वय 35) असे आहे. हुसेन हे मालाड-मालवणी भागातील होली स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य व मालक आहेत आणि त्यांनी शाळेच्या सुमारे 1000 मुलांचे शुल्क माफ केले आहे.

1000 विद्यार्थ्यांची फी माफ

हुसेन यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळ व लॉकडाऊन दरम्यान कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे. यामुळे त्यांनी शाळेतील 1000 विद्यार्थ्यांची शालेय फी माफ केली आहे आणि शाळेतील उर्वरित 500 विद्यार्थ्यांना परवडेल तितकी फी देण्यास सांगितले आहे. इतकेच नव्हे तर हुसेन हे शाळेत शिकणार्‍या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचा घरी रेशन देखील पुरवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, शाळेतील कोणताच विद्यार्थी उपाशी राहिला पाहिजे नाही.

विद्यार्थ्यांसाठी बायकोचे दागिने घाण ठेवले

कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी हुसेन यांनी बायकोचे दागिने आणि मुलीच्या नावे एफडीसाठी ठेवलेले 8 लाख रुपये खर्च केले आहेत. या पैशातून ते लोकांच्या घरी रेशन पोहचवत आहेत. हुसेन यांनी आपल्या बायकोला विश्वासात घेत त्यांचे दागिने घाण ठेवले आणि 1000 विद्यार्थ्यांची फी माफ केली आणि शाळा सुरू ठेवली. त्यांचे म्हणणे आहे की, शाळा सुरू झाल्यावर पैसे कमवता येतील आणि दागिने परत आणता येतील.

लोकांना मागितली मदत

विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहनही हुसेन यांनी केले आहे. यासाठी शाळेबाहेर ‘सपोर्ट फॉर स्टूडंट’ डोनेशन बॉक्स बसविण्यात आला आहे, तेथे कोणीही पाहिजे त्या प्रमाणात देणगी देऊ शकते. हुसेन यांनी देखील आपल्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना काही दिवस कमी पगारात काम करण्यासाठी विनंती केली आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये, याची काळजी घेतली. हुसेन एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने परिसरातील गरीब लोकांना रेशन देखील पुरवण्याचे काम करत आहेत.

समाजासमोर नवा आदर्श

आपण बघितले असेल की, एका बाजुला फी न भरल्यामुळे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. तर मुंबईतील हुसेन शेख हे विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये आणि विद्यार्थी हा शिक्षणापासून दूर जाऊ नये. यासाठी धडपड करत आहेत. यामुळेच मुंबईतील ‘श्रीमंत’ मनाचा शाळा मालक असे हुसेन यांना म्हणण्यात येत आहे.

संबंधित बातम्या : 

ICSE board exam: कोरोनाच्या धोक्यामुळे ICSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

राज्य सरकार दहावीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवणार का? शिक्षणतज्ञांचं मत काय?

(Mortgaging wifes jewelry hussain sheikh waived fees-of 1000 school children example of humanity)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.