कंपन्या गुजरातला नेल्या, धारावीची जमीन बळकावण्याचा डाव; राहुल गांधींचा आरोप
महाविकासआघाडीची आज पहिली प्रचार सभा मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर होत आहे, या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. सर्व संस्थामध्ये संघाच्या लोकांना टाकण्याचा डाव सुरु असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
मुंबईत आज महाविकासआघाडीची सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित आहेत. सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, ‘ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे आंबेडकरांचं संविधान, एकता, समानता, प्रेम, आदर आहे आणि दुसरीकडे द्वेष, समोरून नाही छुप्या पद्धतीने भाजपचे लोक संघाचे लोक या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. समोरून सांगत नाहीत. समोरून सांगितलं तर परिणाम त्यांना माहीत आहे. त्यांच्या विरोधात संपूर्ण देश उभा राहील. त्यामुळे ते समोरून बोलत नाही. छुप्या पद्धतीने संविधान कमकुवत करत आहेत.’
संघाच्या लोकांना थेट संधी – राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या संस्था आहेत. नोकरशाही आहे. शिक्षण व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे. एका पार्टीला एका विचारधारेला हे लोक त्यांची लोक सर्व संस्थेत घुसवत आहेत. इंडिया आघाडीचे लोक हे करत नाही. विद्यापीठाचे कुलगुरुंची यादी पाहा. त्यात त्यांचं मेरिट दिसणार नाही. क्वालिफिकेशन फक्त संघाचा असावा. कुलगुरू बनायचं तर संघाचे सदस्य व्हा. शिक्षणाची गरज नाही. संघाचे असाल तर थेट तुम्हाला संधी मिळेल. फक्त विद्यापीठाबाबत हे होत नाही, देशातील सर्व संस्थांबाबत असं होत आहे.
निवडणूक आयोगावर दबाव
राहुल गांधी म्हणाले की, सरकार निवडणूक आयोगावर दबाव टाकत आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून सरकार पाडत आहे. मागची सरकार तुमची आणि आमचं सरकार होतं. इंडिया आघाडीचं सरकार होतं. चोरी करून, पैसे देऊन ते सरकार पाडलं.
दोन तीन उद्योगपतींना मदत करायची होती. तुम्हाला माहीत आहे, धारावीची जमीन एक लाख कोटी रुपयांची जमीन, गरीबांची जमीन तुमची जमीन तुमच्या डोळयासमोरून हिसकावली जात आहे. सर्व जागाला माहीत आहे. एका उद्योगपतीला ही जमीन दिली जात आहे. तुमचे प्रकल्प होते, बोईंगचं युनिट असो की अॅपलची फॅक्ट्री तुमच्याकडून काढून दुसऱ्या राज्यात नेत आहे. या प्रकल्पामुळे पाच लाख नोकऱ्या मिळाल्या असत्या. त्या सर्व गुजरातला गेले.