कोल्हे यांना बोलायला वेळ दिला, पण माइक का बंद का केला ? कोल्हे यांना काय बोलायचं होतं?
कायद्याची तरतूद करण्यात आली तर कुणाचीही हिंमत होणार नाही, कोणत्याही महापुरुषाबद्दल बोलतांना विचार करूनच बोलतील. पण बोलतांना दोनच वाक्यात माइक बंद करण्यात आल्याचा आरोप कोल्हे यांनी केला.
प्रदीप कापसे, दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आज संसदेत बोलण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, सुरुवातीचे एक ते दोन वाक्य बोलल्यानंतर त्यांचा माइक बंद करण्यात आला. त्यावरून खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अमोल कोल्हे यांच्याबद्दल जे घडलं त्याबद्दल त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये अमोल कोल्हे यांनी म्हंटलंय, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता. महाराजांवर अपमानजनक बोलणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी कायदा करावा ही मागणी करणार होते. माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही असा टोला लगावत लगावला आहे. संसदेत खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा ‘जय शिवराय’ आवाज घुमला असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. जरी आमचा माईक बंद केला तरी शिवभक्तांचा आवाज बंद करू शकणार नाही म्हणत कोल्हे यांनी विधानसभा अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे.
संसदेच्या अधिवेशनात शून्य प्रहारमध्ये मला बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुष यांच्याबद्दल अवमान कारक बोलणं थांबविण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करणार होती.
कायद्याची तरतूद करण्यात आली तर कुणाचीही हिंमत होणार नाही, कोणत्याही महापुरुषाबद्दल बोलतांना विचार करूनच बोलतील. पण बोलतांना दोनच वाक्यात माइक बंद करण्यात आल्याचा आरोप कोल्हे यांनी केला.
संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही!! जय भवानी, जय शिवराय??#ParliamentWinterSession #ChhatrapatiShivajiMaharaj #JaiBhavaniJaiShivray pic.twitter.com/XlUVy3ipEu
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 8, 2022
माइक बंद केल्यानंतर शिवभक्तांच्या भावना किंवा आवाज कुणालाही दाबता येणार नाही, शिवभक्तांचा आवाज कानठीळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही असाही टोला कोल्हे यांनी लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमान करण्याची ख्याती कुणाचीही होऊ नये, मग कोणतेही संविधान पदावर असो कोणत्याही जबाबदारीच्या पदावर असेल त्यांची हिंमत होणार नाही यासाठी कायद्यात तरतूद करावी अशी मागणी कोल्हे यांनी यावेळी केली.