VIDEO : खासदार नवनीत राणा यांचा आदिवासी महिलांसोबत ठेका

खासदार नवनीत राणा यांचा आदिवासी महिलांसोबतचा (MP Navneet Rana dance) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या आदिवासी महिलांसोबत पारंपरिक नृत्य करताना दिसत आहेत.

VIDEO : खासदार नवनीत राणा यांचा आदिवासी महिलांसोबत ठेका
Follow us
| Updated on: Mar 10, 2020 | 6:25 PM

अमरावती : खासदार नवनीत राणा यांचा आदिवासी महिलांसोबतचा (MP Navneet Rana dance) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या आदिवासी महिलांसोबत पारंपरिक नृत्य करताना दिसत आहेत (MP Navneet Rana dance). हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

होळी निमित्त नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दरवर्षी मेळघाटातील अनेक गावांमध्ये जावून आदिवासींना शुभेच्छा देतात. यावर्षीदेखील ते होळी निमित्त पाच दिवस मेळघाटातील विविध गावात गेले आणि आदिवासी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे यावर्षी नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत पारंपारिक आदिवासी नृत्य करुन होळी साजरी केली.

नवनीत राणा यांनी आज सकाळी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या. “रंगपंचमी साजरी करताना पर्यावरणीय रंगांचा वापर करा आणि काळजी घ्या”, असं आवाहन त्यांनी केलं.

नवनीत राणा आपल्या मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना हजर राहून सहभागी होतात. याअगोदर सप्टेंबर 2019 मध्ये नवनीत राणा यांचा दांडीया खेळल्याचा व्हिडीओ समोर आला होता. अमरावतीतील रचना नारी मंचने दांडीयाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणात खासदार नवनीत राणा (Navneet rana garba dance) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी नवनीत राणा दांडीया खेळल्या होत्या.

सिनेअभिनेत्री म्हणून नवनीत राणा या प्रसिद्ध आहेत. त्यातच त्यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून विजय मिळवला. नवनीत राणा यांचे पती रवी राणाही विद्यमान आमदार आहेत.

दरम्यान, नवनीत राणा यांनी निवडून आल्यानंतर कामांचा धडाका लावलाय. जिल्ह्यामध्ये फिरुन समस्या समजून घेणे, प्रशासनाला योग्य आदेश देणे यासह विविध कामे त्यांच्याकडून केली जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कुपोषणाचं प्रमाण मोठं आहे. याकडेही नवनीत राणा लक्ष देत आहेत. शिवाय त्यांनी संसदेतही निराधारांना जास्त मदत देण्याची मागणी केली होती.

हेही वाचा : VIDEO : खासदार नवनीत राणांचा दांडीयाच्या गाण्यावर ठेका

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.