AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यधुंद ट्रकचालक थेट खासदार प्रताप चिखलीकरांच्या कारच्या दिशेने, कारचालकामुळे अपघात टळला

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhalikar) आज दुपारी एका अपघातातून बालंबाल बचावले. ते लोहाकडे जात असताना वाडी पाटीजवळ लोहाकडून येणारा एक ट्रक भरधाव वेगात त्यांच्या कारवर येत होता. मात्र, चिखलीकरांच्या कारचालकाच्या प्रसंगावधानाने एक मोठा अनर्थ टळला.

मद्यधुंद ट्रकचालक थेट खासदार प्रताप चिखलीकरांच्या कारच्या दिशेने, कारचालकामुळे अपघात टळला
Follow us
| Updated on: Oct 28, 2019 | 6:51 PM

नांदेड : भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhalikar) आज दुपारी एका अपघातातून बालंबाल बचावले. आज दुपारी ते (MP Pratap Patil Chikhalikar) आपल्या लोहा इथल्या समर्थकांना भेटण्यासाठी निघाले होते. लोहाकडे जात असताना वाडी पाटीजवळ लोहाकडून येणारा एक ट्रक भरधाव वेगात त्यांच्या कारवर येत होता. चुकीच्या दिशेने येणाऱ्या या भरधाव ट्रकला पाहून खासदार चिखलीकर यांच्या चालकाने सरळ आपली गाडी रस्त्याच्या खाली उतरवली. खासदारांची गाडी वेळेत रस्त्याच्या खाली उतरल्यामुळे अनर्थ टळला, अन्यथा मोठा अपघात घडला असता.

घटना घडली तेव्हा गाडीत खासदारासह युवा नेते माधव पावडे हे सुद्धा प्रवास करत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने आणि तेही भरधाव येणारा ट्रकचालक नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदारांच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अपघात टळला. यात खासदार चिखलीकर आणि माधव पावडे यांना काहीही दुखापत झाली नाही.

मात्र हा नेमका अपघात होता की यामागे काही कट कारस्थान होते याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी हा ट्रक जप्त करत ग्रामीण पोलीस ठाण्यात लावला आहे. अधिक तपास पोलीस करतायत, त्या नंतरच यातील सत्यता कळणार आहे.

नांदेड जिल्ह्यात कट कारस्थान करत अनेक नेत्यांना अपघात घडवून आणले गेले होते,  असं नेहमीच चर्चिले जाते. त्यामुळे चिखलीकर यांच्या अपघाताबद्दल शंका घेणे साहजिकच आहे. या अपघाता मागचे तथ्य पोलिसांनी उघड करावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.