तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस, प्रीतम मुंडेंच्या पंकजांना खास फोटो शेअर करत शुभेच्छा

ट्विटमध्ये लिहिल्याप्रमाणे फोटोतही पंकजा मुंडे जबाबदारी पार पाडण्याच्या भूमिकेत आहेत तर प्रीतम मुंडे ह्या लहान बहिणीनं ऐकावं तशा भूमिकेत दिसतायत.

तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस, प्रीतम मुंडेंच्या पंकजांना खास फोटो शेअर करत शुभेच्छा
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 9:43 AM

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस. त्या 42 वर्षांच्या झाल्या. त्या 26 जुलै 1979 हा त्यांचा जन्मदिवस. त्यासाठी सोशल मीडियावर त्यांना खास पद्धतीनं शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्ते, चाहत्यांमध्ये चढाओढ लागलीय. त्यातही विशेष शुभेच्छा दिल्यात त्या त्यांची लहान बहिण आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी. त्यांनी दोन तीन फोटो ट्विट करत पंकजा मुंडे त्यांच्यासाठी नेमक्या काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.

काय आहे प्रीतम मुंडेंच्या ट्विटमध्ये? पंकजा मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी प्रीतम मुंडेंनी फेसबूक आणि ट्विटर अशा दोन्ही माध्यमांचा वापर केलाय. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रीतम ट्विटमध्ये म्हणतात- ‘5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा’.

तीन फोटो आणि त्यांची गोष्ट पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतम मुंडे यांनी तीन फोटो ट्विट केलेत. फेसबूकवर शेअर केलेत. तीनही फोटोत दोन्ही बहिणी आहेत. यातला पहिला फोटो हा दोघींच्या लहानपणीचा आहे. त्याच फोटोत पंकजा मुंडेंनी कानाला फोनचा रिसिव्हर लावलेला आहे. तर प्रीतम मुंडे ह्या बाजुला बसून हसतायत. त्यांच्या ओठीत एक बाहुलीही आहे. विशेष म्हणजे दोन्ही बहिणींच्या अंगावर सेम ड्रेस आहे. दुसरा फोटो त्यांचा अलिकडच्या काळातला आहे. यात दोन्ही बहिणी ह्या व्यासपीठावर बसलेल्या आहेत आणि काही तरी संवाद त्यांच्यात सुरु आहे. हा संवाद गंभीर चालला असावा असं दोघींच्या चेहऱ्यावरुन दिसतं. त्यातही पंकजा काही तरी प्रीतमना सांगतायत आणि ते त्या मन लावून ऐकताना दिसतायत. तिसरा फोटो हा पुन्हा एका व्यासपीठावरचाच आहे. बहुतेक तो दसरा मेळाव्यातला दिसतोय. इथेही पंकजा बोलतायत आणि प्रीतम मुंडे ह्या गर्दीकडे बघून ऐकतायत असं दिसतं. दोन्हींच्या अंगावर सोनेरी पिवळ्या रंगाचे ड्रेस आहेत.

ट्विटमध्ये लिहिल्याप्रमाणे फोटोतही पंकजा मुंडे जबाबदारी पार पाडण्याच्या भूमिकेत आहेत तर प्रीतम मुंडे ह्या लहान बहिणीनं ऐकावं तशा भूमिकेत दिसतायत.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.