Sanjay Raut : भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण बनवा! गोवंश हत्याबंदीचं उदाहरण देत राउतांनी केंद्राला फटकारलं
मुंबई : राज्यात सध्या भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. तर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदींवरील (mosque) भोंग्यावरून आपली भूमिका ठाम ठेवली आहे. तसेच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला. त्यावरून आता राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारही आता त्यावर ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तर आता वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांनीही राज […]
मुंबई : राज्यात सध्या भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. तर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदींवरील (mosque) भोंग्यावरून आपली भूमिका ठाम ठेवली आहे. तसेच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला. त्यावरून आता राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारही आता त्यावर ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तर आता वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांनीही राज यांच्या या भूमिकेवर आक्रमक पवित्रा घेतला असून त्याला विरोध दाखवला आहे. तर काही मुस्लिम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भोंग्याच्या या राजकारणामुळे राज्यातील दोन समाज हे एकमेकांच्या समोर येण्याची लक्षणे दिसत आहेत. त्यानंतर आता भोंग्यावरून सुरू असणाऱ्या राजकारणावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्राला फटकारले आहे. तसेच त्यांनी भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण बनवा अशी मागणी केली आहे.
राऊतांचा केंद्रावर निशाणा
सध्या राज्यात भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापलेले असताना यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्राला निशाणा केला. त्यांनी यावेळी पंतप्रधान मोंदींही सोडले नाही. यावेळी राऊत यांनी, गोवंश हत्याबंदीचं उदाहरण देत पंतप्रधान मोंदी फटकारलं. तसेच ते म्हणाले की, जसा तुम्ही गोवंश हत्याबंदीसाठी धोरण बनवलं, पण काही राज्यांना अपवाद देण्यात आला. तसाच विचार येथेही करायला हवा.
भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण बनवावं
राज्यातील भाजपचे लोक भोंग्यावरून राजकारण करत आहेत. त्यामुळे मोदींनी भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण बनवावं. महाराष्ट्र नेहमीच राष्ट्रीय धोरणांचं पालन करत आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमचं मोदींना आवाहन आहे की, तुमच्या लोकांनी लाऊडस्पीकरला घेऊन जी मागणी केली आहे, त्याला घेऊन एक राष्ट्रीय धोरण बनवावं. महाराष्ट्र आपोआपच त्यात येईल. गुजरातप्रमाणेच बिहारमध्येही हे धोरण राबवा.
शांतता भंग करण्याची इच्छा नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे इथं पत्रकार परिषदेत बोलताना तुम्ही दिवसातून पाच वेळा भोंगे लावणार असाल तर आम्हीही दिवसातून पाचवेळा भोंग्यावर प्रार्थना लावणार. आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला हत्यार हातात घ्यायला लावू नका, असा इशारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रात आम्हाला दंगली नको आहेत. महाराष्ट्राची शांतता भंग करण्याची इच्छा नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लीम समाजाने याचा विचार करावा. प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही,” असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
SC च्या सूचनांचे पालन करू
त्यानंतर महाराष्ट्रातील मुस्लिम विचारवंतांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शांतता राखण्यासाठी अजान आणि लाउडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मुस्लिम संघटनांनी म्हटले होते.
पहा :