Sanjay Raut : राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणाले….
"महाविकास आघाडीला कुठलाच फटका बसणार नाही. 175 जागा जिंकून महाविकास आघाडी 26 तारखेला सरकार बनवणार. सगळं व्यवस्थित आहे, कोणाला शंका असेल तर संध्याकाळी भेटा. आम्ही सगळे एकत्र दिसू" असं संजय राऊत म्हणाले.
“बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर कधीही येऊ शकतात. आम्ही सुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकतो. मी सुद्धा शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे बसून चर्चा केली. 288 जागांवरती प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. इतर राज्यांप्रमाणे नाही, तीन प्रमुख पक्ष आहेत” असं खासदार संजय राऊत जागा वाटपाच्या मुद्यावर म्हणाले. “बाळासाहेब थोरात यांचं हाय कमांड दिल्लीला आहे. दोन दिवस सगळे दिल्लीत होते. उत्तम समन्वय आमच्यात आहे, तसं नसतं तर 90-90 जागा आम्ही जाहीर केल्या नसत्या” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “नाना पटोले याच्याशी चांगला संवाद सुरू आहे. काल आमचा संवाद झाला आणि एका जागेची अदलाबदल देखील आम्ही केली. हिंगोलीच्या जागेबाबत आत्ता पाच मिनिटांपूर्वी चर्चा झाली” असं संजय राऊत म्हणाले.
“लेटर बॉम्ब हे आमच्या रेकॉर्ड साठी असतात. मी, ही जयंत पाटील यांना पत्र पाठवले. पत्र यासाठी पाठवायचे की, आपल्यासोबत चर्चेसाठी एक कागद राहतो. न्यायालयात पुरावे टिकत नाही. सर न्यायाधीश पुरावे मानायला तयार नाही. अपात्र संदर्भात पुरावे असून ते मानायला शरद पवार सारखा भक्कम पुरावा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना देतात” असं संजय राऊत म्हणाले.
‘कोणाला शंका असेल तर संध्याकाळी भेटा’
“महाविकास आघाडीला कुठलाच फटका बसणार नाही. 175 जागा जिंकून महाविकास आघाडी 26 तारखेला सरकार बनवणार. सगळं व्यवस्थित आहे, कोणाला शंका असेल तर संध्याकाळी भेटा. आम्ही सगळे एकत्र दिसू” असं संजय राऊत म्हणाले. राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चांवरही संजय राऊत बोलले. “राहुल गांधी यांना मी ओळखतो, त्यांनी पक्षाच्या बैठकीत एखादी भूमिका मांडली असेल, त्याला मी नाराजगी म्हणत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे राहुल गांधींसोबत मधुर संबंध आहेत” असं संजय राऊत म्हणाले.