AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवजयंती पूर्वी रायगड उजळणार, श्रीकांत शिंदे यांच्या स्वनिधीतून रोषणाई

स्वत:च्या खर्चाने रायगडावर शिवजयंतीपूर्वी आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे. (MP Shrikant Shinde Shivaji Maharaj jayanti)

शिवजयंती पूर्वी रायगड उजळणार, श्रीकांत शिंदे यांच्या स्वनिधीतून रोषणाई
श्रीकांत शिंदे
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 10:30 PM

मुंबई : स्वत:च्या खर्चाने रायगडावर शिवजयंतीपूर्वी आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच, शिवजयंतीनिमित्त रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना अल्पोपहाराचेही शिंदे यांच्या हस्ते वाटप केले जाणार आहे. विशेष शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी दोन लाखाची आर्थिक मदत दिली. तसेच श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे पालकत्वदेखील स्वीकारले आहे. (MP Shrikant Shinde announcment of electricity arrangment Brfore the Shivaji Maharaj jayanti)

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे केल्ले रायगडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांकडे लक्ष्य देऊन त्यांच्यावर उपाय सुचवले. निसर्ग वादळानंतर रायगड किल्यावरील विद्यूत रोषणाई कोलमडली होती. त्यानंतर पुरातत्व खात्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. ही बाब शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर शिंदे यांनी येथील विद्युत रोषणाईचे साहित्य स्वतः देण्याची घोषणा केली. तसेच, 19 फेब्रुवारी पूर्वी रायगड उजळला पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले.

यावेळी येत्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर 18 आणि 19 रोजी रायगड 48 तास खुला ठेवावा, अशी मागणी शिंदे यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. शिंदे यांची ही मागणी पुरातत्व खात्याने लगेच मान्य केली.

तानाजी मालुसरे यांच्या वंशजाचे पालकत्व स्वीकारले

यावेळी त्यांनी तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. ही मदत 7 मार्च रोजी उमरठ येथे तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनी सुपूर्द केली जाणार आहे. तसेच रायबाच्या पुढील आयुष्याचे पालकत्वही शिंदे यांनी स्वीकारले.

दरम्यान, खासदार शिंदे यांनी तानाजी मालुसरे यांच्या वंशजांना महाडमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मालुसरे यांच्या वंशजांच्या अडचणी जाणून घेतल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजी मालुसरे यांना अर्पण केलेल्या कवड्याच्या माळेचे दर्शनही खासदार शिंदे यांनी घेतले.

इतर बातम्या :

शिवजयंतीचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी, वाचा कुठले नियम पाळावे लागतील?

सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

शिवजयंतीवरुन धनंजय मुंडे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना बोललो होतो, आता अजित पवार म्हणतात….

(MP Shrikant Shinde announcment of electricity arrangment Brfore the Shivaji Maharaj jayanti)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.