Supriya Sule : ‘आमचं आयुष्य उध्वस्त करून ते…’ सुप्रिया सुळे मनातलं बोलल्या

Supriya Sule : "भाजप जुना पक्ष आहे तरी आजही त्यांच्या पक्षात टॅलेंट दिसत नाही, चांदीच्या ताटात जेव्हा वेळ आहे जेवायची. वेळ येते तेव्हा भाजपचे कार्यकर्ते बसत नाहीत तर बाहेरून आलेले बसतात, काही केलं तर महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीशी आहे फार त्यांना यश मिळेल असं वाटत नाही" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : 'आमचं आयुष्य उध्वस्त करून ते...' सुप्रिया सुळे मनातलं बोलल्या
सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 12:30 PM

“महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार. एक वर्षांपूर्वी आम्ही कुठे होतो? आणि आज कुठे आहोत? एक वर्षांपूर्वीं पक्ष कुठे होता? चिन्ह कुठे होतं? आमदार-खासदार जी, जी सत्तेची पद होती, त्यातील पक्ष, चिन्ह घेऊन आमचं आयुष्य उध्वस्त करून ते घेऊन गेले. मुलीचा वाढदिवस कोर्टात केला मी. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली, कारण का मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे, अदृश्य शक्तीला असं वाटतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते. या राज्याने दाखवून दिलं की अदृश्य शक्ती ते चालवू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

गडकरी साहेब विकासाच्या मुद्यावर राजकारण करत नाहीत ते म्हटले की “वेळ पडली तर पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नवीन निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर रस्ता पूर्ण करू” “अतिथी देवो भव. पाहुण्यांचे स्वागत झालंच पाहिजे, आम्ही अदृश्य शक्ती वाले नाही. आम्ही संविधान वाले आहोत, संविधान केंद्र ठेवून आम्ही राजकारण करतो, सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे, शरद पवार यांना रोखा, उद्धवजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या” अशी त्यांची विचारसरणी असल्याच सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘भर चौकात फाशी द्या’

“कोणीही अत्याचार करणाऱ्या व्यक्ती असतील. फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, एन्काऊंटर वगैरे करू नका व्यवस्थित काम करा अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. भर चौकात फाशी द्या, सगळ्यांसमोर. त्याशिवाय हा विषय संपणार नाही वर्दीचा धाक देशात राहिला नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘माझा फोन इनकमिंगसाठी सदैव चालू’

“माझा फोन इनकमिंगसाठी सदैव चालू असतो, ब्लॉक करून बंद करून त्याला लोकशाही म्हणत नाही, माझी वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई नाही. डायलॉग माझा गेलेल्या सर्वांशी होता ते बोलत नाहीत, त्यांचा प्रश्न आहे, मी कोणाशी कधीही संबंध तोडले नाहीत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “आपण नेहमी गोमाताच म्हणतो. गाईला माता म्हणणारी आपली संस्कृती आहे. अन्नपूर्णेची ही आपण पूजा करतो. अन्नाची पूजा होते, त्यामुळे मला नवीन वाटत नाही. जे आपल्यावर संस्कार झालेले आहेत बैलपोळा करतोच, आम्ही सगळे शेतकरी आहोत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.