एकेरी भाषेत बोलतात तुमची लायकी काय रे…उदयनराजे भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर काय म्हणाले..

शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना घेऊन काम केलं, आता फक्त मी-मी सुरू झालं आहे, स्वतःचं व्यक्तिमत्व मोठं करण्यासाठी दुसऱ्याला नाव ठेवतात, यांची लायकी नाही असे म्हणत इशाराही दिला आहे.

एकेरी भाषेत बोलतात तुमची लायकी काय रे...उदयनराजे भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर काय म्हणाले..
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 2:06 PM

नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsinh koshyari ) यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यावर खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle )  यांनी चांगलीच आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे यांनी थेट हल्लाबोल करत नव्या राज्यपालांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहे. राष्ट्रपती जसे देशाचे प्रमुख असतात तसे राज्याचे राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात त्यामुळे त्यांनी जपून बोललं पाहिजे, त्यांच्या विधानाकडे सर्वांचे लक्ष लागून असते. त्यांच्या विधानामुळे जातीजातीत वाद होऊ शकतात असेही उदयनराजे यांनी म्हंटलं आहे.

पुढे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, शिवाजी महाराज यांनी युद्ध केलं ते जनतेला न्याय मिळून देण्यासाठी केला आहे, जे आपण करू शकत नाही.

ज्यांची ऊंची नाही ते अशी विधाने करतात, अशी मोठी विकृती आपल्याला पाहायला मिळते, त्यांची व्याप्ती संकुचित आहे, अलीकडच्या काळात काही लोकांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना घेऊन काम केलं, आता फक्त मी-मी सुरू झालं आहे, स्वतःचं व्यक्तिमत्व मोठं करण्यासाठी दुसऱ्याला नाव ठेवतात, यांची लायकी नाही असे म्हणत इशाराही दिला आहे.

ते एक भगतसिंग होते, पण हे एक भगतसिंग आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांचे नामकरण केलं त्यांना काय बोलणार आता, एकेरी भाषेत बोलतात तुमची लायकी काय रे, त्यांनी जे केलं तिथं आपण पोहचू शकत नाही असा थेट हल्लाबोल उदयनराजे यांनी केला आहे.

सोईप्रमाणे सगळं केलं जातं आहे, मतं मिळविण्यासाठी सगळं चालल आहे, व्यापीठावर शिवाजी महाराज यांचा फोटो ठेवला जातो, हार घालतात आणि मत मागतात असेही उदयनराजे यांनी म्हंटलं आहे.

शिवाजी महाराज यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे, पुढील काळात कुणी काहीही चुकीचम बोललं तर आम्ही असं काहीही खपून घेणार नाही, कुणाकडे व्यक्त व्हायचे हाणून त्यावेळी रायगडावर गेलो.

महाराजांचा विचार सोडला तर देशाचे किती तुकडे होतील, भारताचा युनायटेड स्टेट इंडिया होऊन जाईल असे मतही उदयनराजे यांनी व्यक्त करत जातीपातीच्या पलीकडे जाऊन मी काम करतो असे म्हंटले आहे.

सगळ्यांनी मर्यादा ठेऊन बोललं पाहिजे, वास्तविक उशीर झाला आहे, मला लोकं विचारायचे मी तेव्हाच सांगितलं की आता काय करू ? पण आता निर्णय झाला आहे.

वेळेत निर्णय घेतला तर बरेच काही सावरता येतं, आपल्याकडे एक महान आहे, उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे अन्याय असतो, मी व्यक्तिदोष करत नाही माझा विरोध विचारांचा होता असेही उदयनराजे भोसले यांनी म्हंटलं आहे.

कोश्यारीचं वय पाहता त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं, निवृत्तीचं वय नोकरीला लागू करतात, तसं राजकारणात वयाचे बंधन लावावे. तरुण पणातच काही जबाबदाऱ्याच दिल्या पाहिजे, जास्त वय असलेले लोकं नसायला पाहिजे

नवे राज्यपाल रमेश बैस यांचे मी स्वागत करतो. आम्ही सर्व सहकार्य करू त्यांनी महापुरुषांच्या बाबतीत विचार संपूर्ण देशात पोहचवावा अशी अपेक्षाही उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.