MP Vinayak Raut| राणे कुटुंबाचा पिंड विकृतीचा, तर दानवे विनोदी बोलतात; विनायक राऊतांकडून टीकेची झोड

खासदार विनायक राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंबीय आणि नितीन गडकरी यांचं नात चांगलं आहे. महाविकास आघाडी कोणीही भंग करू शकणार नाही.

MP Vinayak Raut| राणे कुटुंबाचा पिंड विकृतीचा, तर दानवे विनोदी बोलतात; विनायक राऊतांकडून टीकेची झोड
Narayan Rane, Raosaheb Danve, Vinayak Raut
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 12:34 PM

मुंबईः केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना विनोदांनी बोलण्याची सवय आहे, तर नारायण राणे यांच्या कुटुंबाचा पिंडच विकृतीचा आहे, अशी टीकेची झोड खासदार विनायक राऊतांनी आज उठवली. एकीकडे मराठवाड्यात महाविकास आघाडीचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर स्तुतीसुमने उधळल्याने नवीच राजकीय चर्चा सुरू झालीय. त्यांचाही राऊतांनी समाचार घेतला.

दानवे, सत्तारांना टोले का?

रावसाहेब दानवे यांनी एक जानेवारी रोजी औरंगाबादमध्य बोलताना अक्षरशः फटाक्यांची माळ फोडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही काळ आजारातून बरे झाले नाहीत, तर एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. शिवाय मी शिवसेनेत आग लावण्याचे काम करत नसून, उद्धव यांच्यानंतर शिवसेनेमध्येत तेच नेते सक्षम नेतृत्व करू शकतात, असा दावा केला होता. उद्धव आजारी आहेत. ते बरे व्हायला काही दिवस तरी लागतील. अशावेळी विनाप्रमुखांचं राज्य कसे चालेल? असा सवालही त्यांनी केला होता. शिवाय महाविकास आघाडीचे मंत्री अब्दुल सत्तारांनी शिवसेना आणि भाजप युतीचा पूल नितीन गडकरीच बांधू शकतील, असे विधान केले होते. त्याचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

राऊत म्हणाले की…

खासदार विनायक राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेचं विधान गांभीर्यानं घेण्यासारखं नाही. त्यांना विनोदाने बोलण्याची सवय आहे. भाजपचे विचार त्यांच्या मनात आहेत. त्यामुळे त्यांनी वक्तव्य केले. राज्याचे मुख्यमंत्री राज्याचा कारभार चांगला चालवत आहेत, याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, नारायण राणेच्या कुटुंबाचा पिंड विकृतीचा आहे. ही विकृती गाडण्याचं काम सिंधुदुर्गाच्या जनतेनं केलं. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत आमचीही चमकदार कामगिरी झाली. यापूर्वी आमच्याही एवढ्या सीटस् नव्हत्या, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

ठाकरे-गडकरी नातं चांगलं…

खासदार विनायक राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंबीय आणि नितीन गडकरी यांचं नात चांगलं आहे. महाविकास आघाडी कोणीही भंग करू शकणार नाही. सत्यपाल मलिकांच्या वक्तव्यांनी एकाधिकारशाहीला छेद दिला आहे. देशात एकाधिकारशाही सुरू आहे. नरेद्र मोदींविषयी अनेक भाजपच्या खासदारांचं तेच मत आहे. आता लाव्हा उसळत आहे. त्याचा कधीतरी भूकंप होईल, असा दावाही त्यांनी केला.

इतर बातम्याः

Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड

Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.