MPSC कर निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर, राज्यातून अवधूत दरेकर प्रथम

MPSC Result: राज्य कर निरीक्षक संवर्गातील १५९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर प्रथम आला आहे.

MPSC कर निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर, राज्यातून अवधूत दरेकर  प्रथम
mpsc
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 10:03 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२३मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. MPSC ने १५९ पदासाठी घेतलेल्या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. महिला प्रवर्गातून पुणे जिल्ह्यातील आश्लेषा जाधव राज्यात पहिल्या आल्या. मागास प्रवर्गातून कोल्हापूरच्या रोहित बेहेरे यांनी पहिला क्रमांक मिळवला. सविस्तर निकाल आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

निकाल आयोगाच्या वेबसाईटवर

राज्य कर निरीक्षक संवर्गातील १५९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर प्रथम आला आहे. निकाल आल्यानंतर आता उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आयोगाने परीक्षेचा अंतिम निकाल, प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (कटऑफ) आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहेत.

तर निवड होणार रद्द

राज्य कर निरीक्षक परीक्षेय यशस्वी झालेल्या उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढ‌ळून आल्यास त्यांची निवड रद्द होणार आहे. तसेच उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास ती सुविधा आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. उमेदवारांची गुणपत्रके ऑनलाइन पद्धतीने पाठवल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत एमपीएससीकडे गुण पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

जून महिन्यात होणारी एमपीएससी

लोकसभा निवडणुकीमुळे एमपीएससीच्या काही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीचा महिना माहीत असताना आयोगाने त्यानुसार वेळपत्रक का तयार केले नाही? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.