MPSC PSI results : MPSC च्या PSI पदांचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा बघाल निकाल?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आणि गोड बातमी आहे. कारण पी. एस. आय. 2019 च्या 650 पदांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

मुंबई : एमपीएससी (Mpsc Exam) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आणि गोड बातमी आहे. कारण पी. एस. आय. (PSI result) 2019 च्या 650 पदांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी (PSI list) संकेतस्थळावर प्रसिद्ध केली गेली आहे. विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आणि 2 वर्षानंतर पी.एस.आय पदाचा निकाल जाहीर झालाय. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला आहे तर पात्र विद्यार्थ्यांचा सत्कारही काही ठिकाणी केला गेला आहे. जा. क्र. 08/2019 पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलींक सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती ट्विटरवरून आयोगाने दिली आहे.
लोकसेवा आयोगाचे ट्विट
जा. क्र. ०८/२०१९ पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलींक सुरू करण्यात येत आहे. https://t.co/UqPYplGglK
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 8, 2022
कुठे बघाल निकाल?
https://mpsc.gov.in/ /या एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थलावर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता. तसेच वरती एसपीएससी आयोगाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर जे लिंक दिली आहे. त्यावरही तुम्ही क्लिक करून अधिकृत पात्र विद्यार्थ्यांची यादी पाहू शकता, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांसाठी निकाल पाहणं सोपे झाले आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांनी या संकेतस्थळांना भेट देऊन निकाल पाहिला आहे. ऑनलाईन निकालामुळे विद्यार्थ्यासाठी ही प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
गेल्या दोन वर्षात अनेकदा परीक्षा आणि निकाल लांबणीवर गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर उर्वरीत प्रक्रिया वेगाने पार पाडण्याचा प्रयत्न एमपीएसी आयोगाकडून करण्यात येत आहे. अनेकदा परीक्षा लांबणीवर गेल्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे उद्रेकही आयोगाला सहन करावा लागला आहे. वेळोवेळी विद्यार्थी आंदोलने करताना दिसून आले आहेत. मात्र आता निकाल जाहीर झाल्याने विद्यारर्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
RTE अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ, प्लेग्रुप ते पहिलीसाठी वयोमर्यादा निश्चित
JEE Mains 2022 : जेईई मेन्स परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट, NTA कडून विद्यार्थ्यांना अलर्ट