Nanded: एवढा पाऊस पडूनही पाण्यासाठी भटकंती, विष्णुपुरी प्रकल्पापासून 5 किमी अंतरावरची स्थिती, नेमकं कारण काय ?
शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पापासून अवघ्या पाच किलोमीटर असंतावर असलेल्या बळीरामपूर, धनेगाव, तुप्पा, वाजेगाव या चार गावांना मागील पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वीजबिल थकल्यामुळे गावातील महावितरणने येथील वीजपुरवठा खंडित केला आहे.
नांदेडः शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पापासून (Vishnupuri Dam) अवघ्या पाच किलोमीटर असंतावर असलेल्या बळीरामपूर, धनेगाव, तुप्पा, वाजेगाव या चार गावांना मागील पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मराठवाड्यात या वर्षी विक्रमी पावसाची नोंद झाल्यानंतरही ऐन हिवाळ्यात नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) या गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याचे कारण म्हणजे महावितरण! थकीत बिलापोटी महावितरणने मागील पंधरा दिवसांपासून या चारही गावांचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना हा त्रास भोगावा लागत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत सुरुवातीला एका ठेकेदाराला काम देण्यात आले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने तपासणीचे बिल भरले नाही. त्यामुळे या बिलावर पुढे व्याजावर व्याज लागल्याने 4 कोटी 81 लाख 48 हजार 970 रुपयांच्या जवळपास रक्कम थकीत आहे. ही योजना जिल्हा परिषदेकडे 2005 मध्ये हस्तांतरीत झाली. पण तेव्हा बिल भरलेले नव्हते. मागील काही वर्षांपासून महावितरण वारंवार अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडित करत आहे. थकीत बिलापोटी यापूर्वी महावितरणला 10 लाखांचा धानदेश देण्यात आला होता. तरीही वीजपुरवठा खंडित केला गेलाय, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभाग व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटले आहे.
15 दिवसांपासून 4 गावात वीज नाही
महावितरणने मागील 15 दिवसांपासून या चारही गावांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. या चारही गावांमध्ये मिळून एकूण जवळपास 54 हजार लोकसंख्या आहे. त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आहे.
इतर बातम्या-