एसटी महामंडळ आणि सरकारमध्ये काय ठरलं?, विलिनीकरणाचं काय?, बोनस किती?

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर आज कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. एसटी कामगारांनी दिवाळीत आपल्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. त्यात संघटनांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. पाहा काय आहेत आश्वासने...

एसटी महामंडळ आणि सरकारमध्ये काय ठरलं?, विलिनीकरणाचं काय?, बोनस किती?
msrtc Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 8:42 PM

गोविंद ठाकूर, मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत आझाद मैदानात आंदोलन केले आहे. एसटी महामंडळाचे विलीकरण शासनात करण्यात यावे, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत विविध मागण्यांवर कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या अध्यतक्षतेखाली बैठक झाली. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत एसटीच्या कामगारांचा बोनस आणि इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने आंदोलन स्थगित केल्याचे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर आज कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट 6000 रु. सानुग्रह अनुदान जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन देण्याच्या मागणीवर, तसेच एसटी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतन वाढीचा दराची थकबाकीबाबत, शिस्त आवेदन पद्धतीबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक केली असून येत्या 30 नोव्हेंबर 2023 रोजी बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कॅशलेस मेडिक्लेम

एसटी कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजनसाठी तालुका, जिल्हास्तरावर रुग्णालयांची निवड करून एसटी कर्मचाऱ्यांची रुग्णालयांची बिले महामंडळ देय करणार असे बैठकीत ठरले आहे. खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी 240 दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती देण्यात येईल. एसटी महामंडळास स्व-मालकीच्या बस गाड्या खरेदी करण्यासाठी राज्य सरकार 900 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

गणवेशासाठीही तरतूद

एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी एका महिन्यात रोख रक्कम अथवा उत्तम दर्जाचा कपडा देण्यात येईल. तसेच अनुकंपा तत्त्वावरील आणि वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत 30 दिवसांचे विशेष अभियान राबवून नियुक्ती देण्यात येईल असेही निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, शिष्टमंडळामध्ये संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी, प्रकाश कांबळे, बापू हराळे, आशिष बाळासराफ, अनुप खैरनार, पद्मश्री राजे आदी उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...
'त्या' फाईलवर आबांची सही, दादांचे आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला....
'त्या' फाईलवर आबांची सही, दादांचे आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला.....
विरोधकांना मला पाडायचं होतं तर..., रवी राणांच्या सभेत नवनीत राणा भावूक
विरोधकांना मला पाडायचं होतं तर..., रवी राणांच्या सभेत नवनीत राणा भावूक.
'माझा केसांनी गळा कापला, मला बदनाम...', दादांचे आर. आर. पाटलांवर आरोप
'माझा केसांनी गळा कापला, मला बदनाम...', दादांचे आर. आर. पाटलांवर आरोप.
बिचुकले पुन्हा रिंगणात, बारामतीतून लढणार विधानसभा; पवाराचं टेन्शन वाढल
बिचुकले पुन्हा रिंगणात, बारामतीतून लढणार विधानसभा; पवाराचं टेन्शन वाढल.
पवारांच्या तीन पिढ्या जेव्हा भावूक झाल्या, कोणी कोणाची केली नक्कल?
पवारांच्या तीन पिढ्या जेव्हा भावूक झाल्या, कोणी कोणाची केली नक्कल?.
ठाकरेंची माफी, माझी चूक.., नॉट रिचेबल होण्यापूर्वी वनगांची प्रतिक्रिया
ठाकरेंची माफी, माझी चूक.., नॉट रिचेबल होण्यापूर्वी वनगांची प्रतिक्रिया.
'वनगा टेन्शनमध्येच होते, ते म्हणाले जगून काय फायदा....' पत्नी चिंतेत
'वनगा टेन्शनमध्येच होते, ते म्हणाले जगून काय फायदा....' पत्नी चिंतेत.
'शिंदेंनाही रडू कोसळेल, येत्या 26 तारखेनंतर..', राऊतांचा मोठा दावा काय
'शिंदेंनाही रडू कोसळेल, येत्या 26 तारखेनंतर..', राऊतांचा मोठा दावा काय.
कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, भुजबळ म्हणाले....
कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, भुजबळ म्हणाले.....