AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहा, मुरूडमध्ये एसटीच्या नव्या आरामदायी हिरकणी धावणार, पुशबॅक आसने आणि बऱ्याच सुविधा

एसटीच्या रायगड विभागात उद्यापासून दहा हिरकणी बसेस सेवेत येणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी आणखी दहा अशा 20 बसेस रायगड विभागाला मिळणार आहेत.

रोहा, मुरूडमध्ये एसटीच्या नव्या आरामदायी हिरकणी धावणार, पुशबॅक आसने आणि बऱ्याच सुविधा
MSRTC HIRKANI BUS Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 9:03 PM

मुंबई : एसटी महामंडळाने ( MSRTC ) आपल्या ताफ्यातील ‘हिरकणी’ बसेसना ( Hirkani Buses ) आधुनिक रुप दिले आहे. या हिरकणी बसेसना बांधताना आता अ‍ॅल्युमिनिअम ऐवजी माईल्ड स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या बसेसची बांधणी एसटीच्या दापोडी आणि अन्य कार्यशाळेत होत असून उद्यापासून एसटीच्या रायगड ( Raigad ) विभागात नवीन हायटेक ‘हिरकणी’ची सेवा सुरू होणार आहे. या बसेस बीएस – 6 श्रेणीच्या असून एअर सस्पेंशन तंत्राच्या या बसेसना आरामदायी पुशबॅक आसने, मोबाईल चार्जिंग पॉईंट, रिडींग लॅंप आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

एसटीच्या रायगड विभागात उद्यापासून दहा हिरकणी बसेस सेवेत येणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी आणखी दहा अशा 20 बसेस रायगड विभागाला मिळणार आहेत. या नवीन हिरकणी बसेस रायगड विभागाच्या रोहा आणि मुरूड आगाराला मिळणार आहेत. या बसेसची उंची आधीच्या बसेस पेक्षा थोडी कमी आहे. या बसेसमध्ये आरामदायी पुशबॅक आसने, मोबाईल चार्जर पॉईंट, आसनाजवळ रिडींग लाईट असणार आहेत. तसेच या बसेस एअर सस्पेंशन सुविधेच्या असणार आहेत.

माईल्ड स्टीलची बांधणी

एसटी महामंडळाचा लोकप्रिय ब्रॅंड हिरकणी आता हायटेक होत आहे. या बसेसची बांधणी माईल्ड स्टीलमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे या बसेसमध्ये पारंपारिक बसेसमध्ये होणारा धडधड, खुडखुड आवाज येणार नाही. तसेच माईल्ड स्टीलचा समावेश असल्याने अपघातात कमी हानी होत असल्याने प्रवाशांच्या वाहतूकीसाठी देखील या बसेस निर्धोकपणे वापरता येणार आहे. या बसेसना पूर्वी हिरवा आणि जांभळा रंग असायचा आता त्यांनी रंगसंगती बदलण्यात आली आहे.

ब्रॅंड एशियाडचा हिरकणीपर्यंतचा प्रवास

एसटीच्या एशियाड स्पर्धांच्यावेळी 1982 साली खेळाडूंची ने-आण करण्यासाठी प्रथम एशियाड बसेस बांधून दिल्या होत्या. या बसेसचं कौतूक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील केले होते. आशियाई खेळ संपल्यावर या बसेस पुन्हा महाराष्ट्राने विकत घेतल्या आणि ( दादर ) मुंबई ते पुणे मार्गावर त्या चालविल्या. त्यामुळे एशियाड हा ब्रॅंड लोकप्रिय झाला. या एशियाड बसेसनाच नंतर ‘हिरकणी’ हे नाव देण्यात आले. हिरकणी बसेस एसटी महामंडळात रातराणी म्हणून चालविण्यात येतात.

नवीन हिरकणीची वैशिष्ट्ये

● आकर्षक अंतर्गत आणि बाह्य रंगसंगती ● पुशबॅक सीट्स ● रीडिंग लॅम्प ● आसनांजवळ USB मोबाईल चार्जिंगची सुविधा ● एअर सस्पेंशन बस

पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च.
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल.
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला.
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्....
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये.
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी.
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच...
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच....
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं.
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.