Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे गर्दी, तर कुठे महिलांची कागदपत्रांसाठी धावपळ, राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे तीन तेरा

या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, मालेगाव, बुलढाणा, संभाजीनगर, नंदूरबार यांसह ठिकठिकाणी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे.

कुठे गर्दी, तर कुठे महिलांची कागदपत्रांसाठी धावपळ, राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचे तीन तेरा
राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचे तीन तेरा
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 3:27 PM

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सोमवारी 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, मालेगाव, बुलढाणा, संभाजीनगर, नंदूरबार यांसह ठिकठिकाणी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे.

पुण्यातील भोरमध्ये महिलांची तहसील कार्यालयात गर्दी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या नोंदणीसाठी पुण्याच्या भोरमध्ये तहसील आणि तलाठी कार्यालयात महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार उत्पन्न दाखला हा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे. हा उत्पन्न दाखला मिळविण्यासाठी तलाठी आणि तहसील कार्यालयात महिलांची तुडुंब गर्दी झाली आहे. या योजनेचा कालावधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 असा आहे. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असणारा प्रत्येक जण कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे.

या योजनेचा लाभ 21 ते 60 या वयोगटातील महिलांना मिळणार आहे. यासाठी आर्थिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असण्यासह आणखी काही निकष लावण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अनेक महिला तहसील कार्यालयासारख्या सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

बुलढाण्यात महिलांना नाहक त्रास

तसेच बुलढाणामध्ये राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेक महिलांसाठी ही योजना त्रासदायक होत आहे. यामुळे महिलांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. महिलांकडून उत्पन्न आणि शिधापत्रिका असताना देखील अनेक कागदपत्रांची का गरज पडत आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. उत्पन्न आणि शिधापत्रिका हा महाराष्ट्राचा आणि तालुक्यातील रहिवासी असल्याचा पुरावा आहे. पण ही सर्व प्रक्रिया किचकट असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवली आहे. मात्र या योजनेमुळे माता-भगिनींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे शासनाने कागदपत्रांची अट शिथील करावी, अशी मागणी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी केली आहे.

संभाजीनगरमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी

संभाजीनगर परिसरात लाडकी बहिण योजनेसाठी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या ही कागदपत्रे काढण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे.

बुलढाण्यात महा-ई- सेवा केंद्रावर लांबच लांब रांगा

तसेच बुलढाणा जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सेंटरवर महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. स्टॅम्प पेपर, तलाठी कार्यालय, महा-ई- सेवा केंद्रावर महिलांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. महिलांच्या या गर्दीमुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळवण्याकरिता अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे.

मालेगावमध्ये सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ 

त्यासोबतच मालेगावमध्येही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून वय वर्ष २१ ते ६० दरम्यानच्या पात्र महिलांना शासनाकडून दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्हाभरातील सर्वच सेतू, तहसील कार्यालयांमध्ये महिलांची तोबा गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे.

या योजनेच्या पात्रतेसाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासून संबंधित कार्यालयांमध्ये महिलांनी गर्दी केली. ग्रामीण भागातून रिक्षा भरुन मिळेल त्या वाहनाने महिला कार्यालयात दाखल होत आहेत. या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र रहिवाशी दाखला, उत्त्पन्न दाखलासह अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत. मालेगाव येथील नवीन तहसील कार्यालयात सकाळपासून महिलांची गर्दी उसळल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. यामुळे सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे.

सोलापुरात योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी

सोलापूरच्या सेतू कार्यालयातही महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सरकारने योजनेसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी अर्जदार महिलांकडून केली जात आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न, रहिवाशी दाखला गरजेचा आहे. हे दाखले काढण्यासाठी महिलांची सेतूमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सेतू कार्यालयसह आजूबाजूचा परिसरही महिलांनी भरून गेल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने या योजनेची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. तसेच सरकारने आणलेली योजना चांगली असून याबद्दल सरकारचे आभार अशाही प्रतिक्रिया महिला देत आहेत.

अटींमध्ये सवलत द्यावी, यवतमाळमधील महिलांची मागणी

यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज घेण्यास दीड तास लागत असल्याची तक्रार अनेक महिलांनी केली आहे. त्यासोबतच या योजनेतील अटींमध्ये सवलत दिल्या जाव्यात अशा मागण्या महिलांकडून केल्या जात आहे. तसेच कालावधी वाढवा, जन्म दाखला आणि जन्म स्थळाची अट शिथील करावी, अशीही मागणी महिलांकडून केली जात आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.