मुक्ताईनगरचे अपक्ष आ.चंद्रकांत पाटील नेमके कोणाच्या गोटात? शिंदे आणि मुख्यमंत्र्याचा पाटील यांना भेटण्याचा निरोप; पाटलांची तातडीने मुंबईकडे कूच

चंद्रकांत पाटील हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसे पाटील हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानल्या जातात. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील बेबनावावर त्यांनी काही दिवसांपूर्वी तोंडसूख घेतले होते. आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असलो तरी मनाने सच्चा शिवसैनिक असल्याचे अनेकदा त्यांनी माध्यमांसमोर जाहीर वक्तव्य केले होते. आता हा कडवा शिवसैनिक कोणत्या गोटात दाखल होतो हे लवकरच कळेल.

मुक्ताईनगरचे अपक्ष आ.चंद्रकांत पाटील नेमके कोणाच्या गोटात? शिंदे आणि मुख्यमंत्र्याचा पाटील यांना भेटण्याचा निरोप; पाटलांची तातडीने मुंबईकडे कूच
मुक्ताईनगरचे आमदार कोणत्या गोटात?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 2:36 PM

मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील(Independent MLA Chandrakant Patil) हे नेमक्या कोणत्या गोटात आहेत, याचं उत्तर अवघ्या काही तासांत मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आलेल्या भूकंपादरम्यान पाटील हे आपल्या मतदारसंघात मुक्ताईनगरात (Muktainagar Constitution) कामानिमित्त आले होते. मात्र राजकीय घडामोडींना वेग येताच त्यांना शिवसेनेत बंडखोरी केलेले नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) या दोघांनी ही तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. आता पाटील हे दोघांपैकी नेमके कोणत्या गोटात जातात याची चर्चा सुरु आहे. पाटील हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसे चंद्रकांत पाटील हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानल्या जातात. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील बेबनावावर त्यांनी काही दिवसांपूर्वी तोंडसूख घेतले होते. आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असलो तरी मनाने सच्चा शिवसैनिक असल्याचे अनेकदा त्यांनी माध्यमांसमोर जाहीर वक्तव्य केले होते. आता हा कडवा शिवसैनिक कोणत्या गोटात दाखल होतो हे लवकरच कळेल.

खडसेंचे कट्टर राजकीय वैरी

आमदार चंद्रकांत पाटील यांचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यांशी सख्य नाही. म्हणायला दोघांचे कार्यक्षेत्र एकच आहे. परंतू, त्यांच्यात विस्तव जात नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत दोघांमध्ये चांगलेच राजकीय द्वंद पेटले होते. नाथाभाऊंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केलेल्या एका विधानावरुन वादंग पेटला होता. त्यानंतर पाटील यांनी ही आक्रमक होत, खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार ही दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरु होती. आतापर्यंत या दोन नेत्यांमध्ये विस्तव जात नव्हता. परंतू विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी, आपण अपक्ष जरी असलो तरी मनाने शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर आपण नाथाभाऊंना मतदान कर असे वक्तव्य करत त्यांनी धक्कातंत्राचाही वापर केला होता.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजन यांच्याशी नुकतीच घेतली होती भेट

या नाराजीनाट्याची स्क्रिप्ट फार पूर्वी लिहिण्यात आलेली असल्याच्या संशयाला फार मोठा वाव आहे. कारण गेल्या मे महिन्यातच भाजपचे नेते गिरिश महाजन यांनी मुक्ताईनगर येथे जाऊन आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती.आघाडी सरकारमध्ये असतानाही त्यांनी भाजपच्या नेत्याशी उघडपणे घेतलेल्या या भेटीमुळे त्यावेळी चर्चेला उधाण आले होते. पंरतू, दोघांनीही ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगत चर्चा टाळली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.