AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

रमेश घाईट हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. (NCP Gram Panchayat Candidate dies)

राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:52 PM

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेलं असताना विजेचा धक्का बसल्याने रमेश घाईट यांचे निधन झाले. घाईट यांच्या निधनाने त्यांच्या जागेसाठी मतदान होणार की नाही, असा प्रश्न उपस्थिच होत आहे. (Muktainagar NCP supported Gram Panchayat Candidate dies)

रमेश घाईट हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे ते उमेदवार होते. शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा धक्का लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, वडोदा ग्रामपंचायतीतील संबंधित जागेसाठी मतदान होणार की रद्द करावे लागणार, यासाठी तहसील विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरीतही उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू

प्रचारासाठी फिरताना ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याची घटना कालच समोर आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील धामापूर ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार परशुराम शिगवण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामापूर ग्रामपंचायतीची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. परशुराम शिगवण हे गाव पॅनल वॉर्ड क्रमांक दोनमधून उमेदवार होते. निवडणुकांचा प्रचार सुरु असताना शिगवण यांना हार्ट अटॅक आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान परशुराम शिगवण यांना प्राण गमवावे लागले.

विजय शिवतारेंच्या बिनविरोध निवडलेल्या बहिणीचे निधन

पुरंदर तालुक्‍याचे माजी आमदार आणि माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची बहीण शोभा बाळासाहेब यादव यांचे गेल्या मंगळवारी (5 जानेवारी) पहाटे निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी सासवडमधील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने त्यांची प्राणज्योत मालवली. सटलवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याचं स्वप्न अधुरं, उमेदवाराचा प्रचारादरम्यान मृत्यू

(Muktainagar NCP supported Gram Panchayat Candidate dies)

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.