Muktainagar Assembly Elections 2024: भावजय भाजपची खासदार अन् केंद्रीय मंत्री, नणंद शरद पवार गटाकडून उमेदवार, राज्यातील बड्या नेत्याच्या घराण्यासाठी प्रतिष्ठेतेची लढत

Maharashtra Muktainagar assembly election 2024: मुक्ताईनगर विधानसभेत रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील लढत होणार आहे. परंतु आता रोहिणी खडसे भाजप ऐवजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत तर चंद्रकांत पाटील अपक्ष ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे यंदाही दोन्ही तुल्यबळ उमेदवारांमध्ये विजय कोणाचा होणार हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

Muktainagar Assembly Elections 2024: भावजय भाजपची खासदार अन् केंद्रीय मंत्री, नणंद शरद पवार गटाकडून उमेदवार, राज्यातील बड्या नेत्याच्या घराण्यासाठी प्रतिष्ठेतेची लढत
rohini khadse-khewalkar chandrakant patil
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 12:24 PM

Muktainagar Assembly Elections 2024: संत मुक्ताई यांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेले मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातील समृद्ध तालुका आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या हा मतदार संघ आहे. 1967 पासून ते 1985 पर्यंत प्रतिभाताई पाटील मुक्ताईनगर तालुक्याच्या (तेव्हाचे एदलाबाद) आमदार होत्या. प्रतिभाताई पाटील काँग्रेसमध्ये असताना या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर मात्र कोथळी गावातील सरपंच एकनाथ खडसे यांनी या भागात भाजपला वाढवण्याचे काम केले. ते 1989 मध्ये पहिल्यांदा या मतदार संघातून आमदार झाले. त्यानंतर मात्र सातत्याने त्यांचाच विजय या ठिकाणी राहिला. 1989 ते 2019 त्यांनीच या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केला. त्या काळात राज्यात भाजप वाढवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पक्षांने त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद आणि विरोधी पक्षनेतेपदही दिले. परंतु 2019 मध्ये त्यांनी तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर मुक्ताईनगर मतदार संघातील गणिते बदलली. आता पुन्हा खडसे यांची मुलीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे आणि विद्यामान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात लढत होत आहे. मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांच्या भावजय असलेल्या रक्षा खडसे भाजप खासदार अन् केंद्रीय मंत्री आहेत. त्यांची नणंद  रोहिणी खडसे शरद पवार गटाकडून विधानसभेत उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत राज्याचे लक्ष वेधणारी असणार आहे.

असा आहे मतदार संघ

मुक्ताईनगर मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड तालुका आणि रावेर तालुक्यातील खिरोदा, सावदा ही महसूल मंडळे आणि सावदा नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश आहे. मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो. या भागात भाजपचे वर्चस्व आहे. 2011 च्या जनगणनेनुसार मुक्ताईनगरमध्ये अनुसूचित जातीचे 40,771 मतदार आहेत. हे प्रमाण 13.77% आहे. अनुसूचित मातीच्या मतदारांची संख्या अंदाजे 38,492 आहे. हे प्रमाण 13% आहे. मुस्लिम मतदारांची संख्या 26,352 आहे. ग्रामीण मतदारांची संख्या अंदाजे 2,79,242 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 94.31% आहे. शहरी मतदार अंदाजे 16,847 आहेत. या मतदार संघात मराठा, लेवा पाटील आणि गुर्जर मतदाराचे वर्चस्व आहे. रोहिणी खडसे लेवा पाटील तर चंद्रकांत पाटील मराठा आहे. गुर्जर मतदार गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जाणार का? या प्रश्नाच्या उत्तरात रोहिणी खडसे यांचा विजय, पराभव अवलंबून आहे.

2019 मध्ये असा होता निकाल

नाव पक्ष मते
चंद्रकांत निंबा पाटील अपक्ष ९०६९८
रोहिणी एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टी ८८३६७
राहुल अशोक पाटील वंचित आघाडी ९७१५
भगवान दामू इंगळे बसपा १५८३
संजू कडु इंगळे बिमकेपी १४०१
ज्योती महेंद्र पाटील अपक्ष ८८८
संजय प्रल्हाद कांडेलकर अपक्ष ५६०

खडसेंना भाजप सोडावी लागली

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ एकनाथ खडसे यांचा हा बालेकिल्ला आहे. खडसेचे राजकारण या भागात वाढले. सरपंचापासून राज्यपातळीवरील नेते ते झाले. परंतु 2014 नंतर भाजपमध्ये एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरु होते. एकनाथ खडसे यांची पक्षात निर्माण झालेली एकाधिकारशाही फडणवीस यांनी मोडून काढली. त्यामुळे 2019 मध्ये त्यांचे तिकीट नाकारण्यात आले. त्यावेळी खडसे म्हणाले, मी पक्षात आतापर्यंत अनेकांना तिकीट दिली. परंतु आता मलाच तिकीट मिळत नाही. एकनाथ खडसे ऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना भाजपने तिकीट दिले होते. परंतु राजकीय कुरघोडीमुळे खडसे यांच्या कन्येचा पराभव झाला. अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पराभूत केले. एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. आता 2024 मध्ये खडसे यांना त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी खडसे यांना मिळाली आहे. परंतु त्यापूर्वी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ खडसे, रक्षा खडसे, रोहिणी खडसे

2014, 2009 मध्ये काय झाले?

2014 मध्ये झालेल्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत भाजपचे एकनाथ गणपतराव खडसे यांना 85,567 मते मिळाली होती. शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांना 75,949 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे अरुण पांडुरंग पाटील 6,499 मते घेऊन तिसऱ्या स्थानावर होते. काँग्रेस उमेदवार योगेंद्र सिंह भगवान पाटील 4,495 मते मिळाली होती. एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 2009 मध्ये भाजपचे एकनाथ गणपतराव खडसे विजयी झाले होते. त्यांना 85,798 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील यांचा खडसे यांनी पराभव केला होता. रवींद्र पाटील यांना 67,3196 मते मिळाली होती. म्हणजेच खडसे यांचे मताधिक्य कमी झाले नव्हते. पण 2019 मध्ये रोहिणी खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्यापेक्षा जास्त मते घेतली. त्यानंतर त्यांचा 1200 मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांची मते जवळपास 13 हजारांनी वाढली होती.

चंद्रकांत पाटील, रोहिणी खडसे, एकनाथ खडसे

खडसे यांची दिल्ली मोहीम अयशस्वी

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय कुरघोडीमुळे खडसे यांनी भाजप सोडली. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेत उमेदवारी दिली. दुसरीकडे त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार होत्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकीय घडामोडी घडल्या. एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. यामुळे खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्याला एकनाथ खडसे यांनीही दुजोरा दिला. परंतु राज्यातील नेत्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला. त्यामुळे केंद्रीय नेत्यांच्या इच्छेनंतर खडसे यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. त्यावेळी रावेर लोकसभा मतदार संघातून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्या निवडून आल्या. आता मोदी मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी त्यांना देण्यात आली.

मुलीसाठी एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठापणाला

चंद्रकांत पाटलांसाठी सत्ताधाऱ्यांची फौज कार्यरत

2019 च्या निवडणुकीत अपक्ष लढणारे आणि खडसे परिवाराला आसमान दाखवणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा मुक्ताईनगर मतदारसंघात देण्यात आला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा त्यांच्या मुलीसाठी पणाला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी महायुतीचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा प्रयत्न करणार आहे. यामुळेच नुकताच मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये मेळावाही घेतला होता.

एकनाथ खडसे, रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात रक्षा खडसे भाजपच्या खासदार अन् मंत्री

एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठापणाला

एकनाथ खडसे यांच्या सून भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहिले. आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मागील वेळेस रोहिणी खडसे भाजपकडून निवडूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासमोर अपक्ष म्हणून उभे राहिलेले शिवसेनेचे चंद्रकांत पाटील होते. या अटीतटीच्या लढतीत चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमधील खडसेंच्या साम्राज्याला धक्का दिला. जवळपास 1200 मतांनी त्यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला. आता 2024 मध्ये पुन्हा रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील लढत होणार आहे. परंतु आता रोहिणी खडसे भाजप ऐवजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत तर चंद्रकांत पाटील अपक्ष ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे यंदाही दोन्ही तुल्यबळ उमेदवारांमध्ये विजय कोणाचा होणार हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.