Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | साचलेल्या पाण्यातून चालताना पाय अडकला, मुंबईत महिला मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली

डीएन नगर परिसरात संबंधित महिला साचलेल्या पाण्यातून चालत होती. पोटरीभर पाणी असल्यामुळे रस्ते, खड्डे किंवा मॅन होल यांचा अंदाज येत नव्हता. चालता चालता महिलेचा पाय अडकला आणि ती खाली पडली

VIDEO | साचलेल्या पाण्यातून चालताना पाय अडकला, मुंबईत महिला मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली
अंधेरीत महिला साचलेल्या पाण्यात पडली
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 12:07 PM

मुंबई : मुंबईत गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्यामुळे अंधेरी भागात एक पादचारी महिला पाय अडकून पडली. सुदैवाने एका महिलेने वेळीच सावरल्याने ती मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली.

मुंबईत पावसाचा जोर

अंधेरीतील डीएन नगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. मुंबईतील अनेक भागात गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसाचा जोर ओसरल्यानंतरही पाणी कायम होतं. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावं लागलं.

नेमकं काय घडलं?

डीएन नगर परिसरात संबंधित महिला साचलेल्या पाण्यातून चालत होती. पोटरीभर पाणी असल्यामुळे रस्ते, खड्डे किंवा मॅन होल यांचा अंदाज येत नव्हता. चालता चालता महिलेचा पाय अडकला आणि ती खाली पडली. महिला मॅन होलमध्ये पडण्याची भीती होती, मात्र शेजारुन जाणाऱ्या पादचारी महिलेने तिला उभं राहण्यासाठी वेळीच हात दिला. त्यामुळे मोठा अपघात टळला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

दरम्यान, 2017 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. साचलेल्या पाण्यातून गाडी नेणे शक्य नसल्याने डॉक्टर उतरुन चालू लागले होते. मात्र संध्याकलाच्या वेळी मॅनहोलचा अंदाज न आल्याने ते पडून वाहून गेले. त्यांचा मृतदेह वरळी समुद्र किनारी सापडला होता.

संबंधित बातम्या :

मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी, मिठी नदीने धोका पातळी ओलांडली, अंधेरी सब वे बंद

(Mumbai Andheri lady saved from falling in Man Hole while walking in flooded water)

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.